गुरूविना मनुष्य जीवन व्यर्थ

By Admin | Updated: March 14, 2016 00:52 IST2016-03-14T00:45:52+5:302016-03-14T00:52:55+5:30

औरंगाबाद : गुरूचे नाव घेतल्यावर आपल्यावर आलेली संकटे मिटतात. ज्याच्या जीवनामध्ये गुरू नाही, त्यांचे जीवन सुरू नाही. यासाठी जीवनात गुरू असणे आवश्यक आहे.

Without a guru man lives in vain | गुरूविना मनुष्य जीवन व्यर्थ

गुरूविना मनुष्य जीवन व्यर्थ

औरंगाबाद : गुरूचे नाव घेतल्यावर आपल्यावर आलेली संकटे मिटतात. ज्याच्या जीवनामध्ये गुरू नाही, त्यांचे जीवन सुरू नाही. यासाठी जीवनात गुरू असणे आवश्यक आहे. गुरूविना मनुष्य जीवन व्यर्थ आहे, असे मार्गदर्शन दिनेशमुनीजी म. सा. यांनी येथे केले.
गुरुगणेश स्थानकवासी जैन शिक्षण समितीच्या वतीने जैन धर्म दिवाकर आचार्यसम्राट देवेंद्रमुनीजी म.सा.यांची ७६ वी दीक्षा जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी महाराज मार्गदर्शन करीत होते. व्यासपीठावर डॉ.द्विपेंद्रमुनीजी म.सा., डॉ.पुष्पेंद्रमुनीजी म.सा.-३, उपप्रवर्तनी प्रकाशकंवरजी म.सा., प्रखर वक्ता सुशीलकंवरजी म.सा., आदिठाणा ८ यांची प्रमुख उपस्थिती होती. देवेंद्रमुनीजी म.सा. हे समग्र मानव समाजाचे धर्माचार्य होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानव कल्याणासाठी वाहिले, अशी माहिती दिनेशमुनीजी म.सा. यांनी दिली. प्रारंभी शेकडो भाविकांनी सामूहिक णमोकार महामंत्राचा जाप केला. प्रास्ताविक शेखर देसरडा यांनी केले.
यावेळी न्या. उमा बोहरा, प्रकाश बाफना, कन्हैयालाल कोटेचा, मंगलाबाई मुगदिया, प्रकाश मुगदिया, नितीन ओस्तवाल, महावीर गादिया, विनोद जैन आदींनी आपले विचार मांडले. प्रकाश मुगदिया, सुभाष देसरडा, मिठालाल कांकरिया, मनसुखलाल बाठीया, झुंबरलाल पगारिया, तनसुख झांबड, विजय देसरडा आदींची उपस्थिती होती. डॉ.प्रकाश झांबड यांनी आभार मानले.

Web Title: Without a guru man lives in vain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.