शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

महिन्याभरात मृतसाठयातील जायकवाडी धरण ७६ टक्क्यांवर, आज माजलगावसाठी केला विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 18:27 IST

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७५.९ टक्क्यावर पोहोचला आहे.

- दादासाहेब गलांडेपैठण ( बीड) : जायकवाडीच्या नाथसागर धरणाची परिस्थिती जुलै  महिन्यात अगदी मृत साठ्यात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात नाशिकसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्याप्रमाणावर आवक वाढली. यामुळे आज धरणाचा पाणीसाठा आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७५.९ टक्क्यावर पोहोचला आहे. दरम्यान, वाढती आवक लक्षात घेऊन शून्य टक्के पाणी असलेल्या माजलगाव धरणात उजव्या कालव्यातून दुपारी १ वाजता १०० क्युसेक विसर्ग करण्यात आल्याची माहिती आहे. 

पाणलोट क्षेत्रात झालेला मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि वरच्या भागातील नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण भरल्याने जायकवाडी धरणात आवक वाढली. यामुळे जुलै महिन्यात मृतसाठ्यात असलेलले जायकवाडी धरण ऑगस्ट महिना संपतासंपता ७५.९ टक्क्याच्या पुढे गेले आहे. आता येणाऱ्या पाण्याची आवक थोडी मंदावली असून ४६ हजार ६८२ क्युसेकने पाणी धरणात येत आहे.  दरम्यान, माजलगावच्या ३२ टीएमसीच्या धरणासाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून दुपारी एक वाजता शंभर क्युसेकने पाणी सोडण्यात आले. तसेच रात्रीतून हळूहळू पाण्याचा वेग वाढवला जाणार असल्याचे शाखा अभियंता विजय काकडे म्हणाले.

जायकवाडी नाथसागर धरण शंभरीकडे वाटचाल करीत आहे. धरणाची पातळी १५२२ फूट आहे. आज रोजी पाणी पातळी १५१७.६९ फूट झाली आहे. माजलगाव धरण ३२ टीएमसीचे आहे. माजलगाव धरण 0% टक्क्यावर असल्यामुळे आज दुपारी १ वाजता जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून १०० क्युसेकने पाणी  सोडण्यात आले आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणMajalgaon Damमाजलगाव धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद