शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
4
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
5
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
6
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
7
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
8
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
9
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
10
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
11
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
12
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
13
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
14
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
15
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
16
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
17
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
18
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
19
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
20
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख

मराठवाड्यात तीन आमदार, तीन खासदारांच्या बळावर उद्धवसेनेची वाट खडतर

By नजीर शेख | Updated: November 30, 2024 15:14 IST

तीन खासदार आणि तीन आमदारांच्या बळावर प्रबळ अशा भाजप-शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अप) महायुतीसमोर उद्धवसेनेची वाट खडतर दिसत आहे.

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसला हादरे देत राज्यात सत्ता आणताना १९९५ मध्ये मराठवाड्यात १५ जागा जिंकणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ तिघेजण निवडून आले आहेत. तीन खासदार आणि तीन आमदारांच्या बळावर प्रबळ अशा भाजप-शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अप) महायुतीसमोर उद्धवसेनेची वाट खडतर दिसत आहे.

सन १९९५ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेसने विधानसभा निवडणुका लढविल्या. त्यावेळी शिवसेनेने राज्यात १६९ जागा लढवून ७३ जागा जिंकल्या होत्या. शरद पवार यांच्या आणि पर्यायाने काँग्रेसच्या सत्तेला शिवसेनेनेच मोठा दणका दिला होता. मराठवाड्यातही लातूर वगळता इतर सर्व जिल्ह्यांतून शिवसेनेचे एकूण १५ आमदार निवडून आले होते. मराठवाड्यात नऊ जागा जिंकत भाजपने त्यावेळी शिवसेनेला मोठी साथ दिली होती. स्वातंत्र्यानंतरच्या काळात मराठवाड्यात काँग्रेस हाच प्रबळ पक्ष राहिला. १९९५ नंतर मात्र परिस्थिती बदलली. शिवसेना आणि भाजपने अनेक मतदारसंघांत शिरकाव करत आपले बस्तान बसवले. शिवसेनेत २०२२ मध्ये झालेल्या फुटीनंतर मराठवाड्यातील १२ पैकी उदयसिंह राजपूत (कन्नड), राहुल पाटील (परभणी) आणि कैलास पाटील (उस्मानाबाद) या मतदारसंघांतील तीन आमदार उद्धव ठाकरेंसोबत राहिले.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत या तिघाजणांसह उद्धवसेनेने १७ जागा लढविल्या होत्या. त्यांपैकी केवळ तीनजण निवडून आले. उदयसिंह राजपूत यांचा पराभव झाला; तर कैलास पाटील आणि राहुल पाटील यांनी आमदारकी टिकविली. प्रवीण स्वामी (उमरगा) हे नव्याने निवडून आले. मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये उद्धवसेनेचा एकही आमदार नाही. परभणी आणि हिंगोली तसेच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघांत उद्धवसेनेचे खासदार आहेत. धाराशिव जिल्ह्यांत दोन आमदार निवडून आले, तर परभणीतून एकजण निवडून आला. हिंगोलीत दोन जागा लढवल्या. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील मतदारसंघ मिळून बनलेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात उद्धवसेनेचा खासदार असूनही या दोन्ही जिल्ह्यांत विधानसभा निवडणुकीला पक्षाच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाला. ओमराजे निंबाळकर आणि बंडू जाधव हे दोन खासदार आक्रमक असले तरी त्यांचा इतर जिल्ह्यांत प्रभाव शून्य आहे. मुळात मुंबईतील नेतृत्वाच्या बळावर उभारलेल्या पक्षाच्या संघटनेला आताही मुंबईच्या नेत्यांचाच आधार घ्यावा लागणार, असे चित्र आहे.

संघटनात्मक ताकद किती?छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या दोन जिल्ह्यांत प्रत्येकी ९ आमदार आहेत. मात्र या दोन प्रमुख जिल्ह्यांतून पक्षाची हद्दपारी झाल्याचे दिसते. नांदेडमध्ये काँग्रेसचा खासदार आहे; तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिंदेसेनेचा खासदार आहे. दोन जिल्ह्यांत पक्षाचा एकही आमदार नाही. मराठवाड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक ठिकाणी प्रशासकराज आहे. त्यामुळे या संस्थांमध्ये पक्षाची ताकद किती आहे, हे गुलदस्त्यात आहे. आगामी दोन-तीन महिन्यांत स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका झाल्यास राज्यात सत्तारूढ महायुतीकडे उमेदवारांचा ओढा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर उद्धवसेनेला सध्या तरी उभारी मिळविण्यासाठी मोठी पराकाष्ठा करावी लागणार आहे.

कोण पेटवणार मशाल?मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरात उद्धवसेनेला जबर तडाखा बसला आहे. २०१९ मध्ये एकत्रित शिवसेनेचे सहाजण निवडून आले होते. यांपैकी केवळ एक आमदार उद्धवसेनेबरोबर राहिला. यंदा विधानसभेत शिंदेसेनेने बाजी मारत सहापैकी सहा जागा जिंकून उद्धवसेनेला पछाडले. उद्धवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने हल्ला चढविणारे अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, रमेश बोरनारे हे आमदार आणि संदिपान भुमरे ही अस्त्रे शिंदेसेनेकडे आहेत. आगामी काळात या तोफा आणखी धडाडणार आहेत. तुलनेत उद्धवसेनेच्या वतीने किल्ला लढविणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेच्या प्रभावाला आळा घालता आला नाही. खोके, गद्दार हे मुद्देही या विधानसभा निवडणुकीने धुऊन काढले आहेत. जिल्ह्यात उद्धवसेनेची पूर्णपणे विझलेली मशाल आता कोण पेटवणार, असा प्रश्न आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMarathwadaमराठवाडा