शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या मोरे कुटुंबीयांनी प्राणपणाने जपल्या आहेत बाबासाहेबांच्या अस्थी

By स. सो. खंडाळकर | Updated: December 6, 2022 13:18 IST

''डॉ. बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन सर्वांना घेता यावे, हीच आमची इच्छा आहे.''

- स. सो. खंडाळकर

औरंगाबाद : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी औरंगाबादच्या मोरे कुटुंबीयांनी प्राणपणाने जपून ठेवल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नियोजित संशोधन केंद्र व वस्तुसंग्रहालयात सन्मानपूर्वक या अस्थी ठेवण्याची या कुटुंबीयांची इच्छा आहे. पण ती कधी फलद्रूप होईल, हे मात्र अनिश्चित आहे. कारण तत्कालीन कुलगुरू बी.ए. चोपडे यांनी पुढाकार घेतलेला हा प्रकल्प थंड्या बस्त्यातच आहे. हे संग्रहालय होणार की नाही, संघर्षातून मिळवलेल्या बाबासाहेबांच्या नावाच्या विद्यापीठात हे संग्रहालय होणार नसेल तर याला काय म्हणावे, असे सारेच प्रश्न अनुत्तरित आहेत. आंबेडकरवादी संघटनांनी त्यात लक्ष घालण्याची गरज आहे.

डॉ. बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन सर्वांना घेता यावे, हीच आमची इच्छा आहे. ६ डिसेंबरला या अस्थिदर्शनासाठी परभणीत असतील. ज्ञानमंदिर उभारून तेथून संशोधक व अभ्यासकांनी विद्यार्जन करावे, अशीच वडील भाऊसाहेब मोरे यांची इच्छा होती, असे वरिष्ठ अधिकारी असलेले प्रवीण मोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

शपथ घेतली होती.....६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे दिल्लीत निधन झाले. १९५६ साली ९ डिसेंबरला अहमदनगर येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली. यावेळी बाबासाहेबांचे प्रमुख अनुयायी उपस्थित होते. ‘समाज एकसंध ठेवू, विभक्त होऊ देणार नाही, फूट पडू देणार नाही, बाबासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहू’ अशी शपथ घेण्यात आली होती.

मंडळाने अस्थी सुपूर्द केल्या होत्या......डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मंडळ नेमण्यात आले. मखमली कापडात गुंडाळलेल्या बाबासाहेबांच्या अस्थी फेडरेशनच्या सर्व प्रांताध्यक्षांना सुपूर्द करण्यात आल्या. यात मराठवाड्याचे प्रांताध्यक्ष भाऊसाहेब मोरे, नाशिकचे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड, मुंबई प्रांताचे अध्यक्ष बी. सी. कांबळे, अहमदनगरचे अध्यक्ष दादासाहेब रोहम, नागपूर- चंद्रपूर-भंडाऱ्याचे बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, पुण्याचे पी. एन. राजभोज, साताऱ्याचे प्रांताध्यक्ष आर. डी. भांगरे, बी. पी. मौर्य यांना या अस्थी सोपविण्यात आल्या होत्या. या सर्वांनी या अस्थी जिवापाड जपल्या.

‘जय भीम’चा नारा.....भाऊसाहेब मोरे यांनी तर कन्नडच्या मकरणपूर येथे त्या काळात बाबासाहेबांच्या सभेेचे नियोजन केले होते व तेथे ‘ जय भीम’चा नारा बुलंद केला होता. आज हा नारा किती जिवाभावाचा झाला आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरAurangabadऔरंगाबाद