शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

विंडमिल कॉम्पिटिशन उत्साहात

By admin | Updated: August 25, 2014 00:26 IST

औरंगाबाद : विंडमिल (अ हँडस् आॅन सायन्स अ‍ॅक्टिव्हिटी कॉम्पिटिशन २०१४) ला शहरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आणि संडे सायन्स स्कूल यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित विंडमिल (अ हँडस् आॅन सायन्स अ‍ॅक्टिव्हिटी कॉम्पिटिशन २०१४) ला शहरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ही स्पर्धा घेण्याचा उद्देश असा की, कृतीतून विज्ञान शिका ही संकल्पना लक्षात घेण्यात आली आहे. तसेच २० आॅगस्ट नॅशनल अक्षय ऊर्जा दिनाचे औचित्य साधून २४ आॅगस्ट, रविवार रोजी ही स्पर्धा लोकमत भवन येथे घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण ९०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यात पवन ऊर्जा, तसेच पवनचक्कीच्या साहाय्याने जास्तीत जास्त एलईडी लाईट लावायचे होते. त्यात काही मुलांनी परिश्रम घेऊन शंभरचा आकडा गाठण्याचा प्रयत्न केला. या प्रकारची स्पर्धा महाराष्ट्रात प्रथमच घेण्यात आली. मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. यात पालक तसेच इंटरनेटच्या माध्यमातून माहिती गोळा करून हे प्रात्यक्षिक पूर्ण करायचे होते. मुलांना शाळेत पुस्तकी स्वरूपात शिकवण्यात येणाऱ्या प्रयोगांचे प्रात्यक्षिक करून घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी जास्तीत जास्त एलईडीची ऊर्जा निर्मिती करणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ. आनंद करवे या वैज्ञानिकाशी भेटता येणार आहे. करवे यांचा ३१ आॅगस्ट रोजी तापडिया नाट्यमंदिरात सकाळी १०.३० ते १.०० वाजेपर्यंत कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ही या स्पर्धेची दुसरी फेरी असेल. यावेळी निवडक विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला जाईल. तसेच पालकांशी संवाद साधला जाईल. यावेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांनी फोनद्वारे कळवण्यात येईल. यावेळी येताना मॉडेल सोबत आणण्याची आवश्यकता नाही. तसेच या स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना आयोजकांतर्फे सहभागाचे प्रमाणपत्रही देण्यात येईल.पहिलाच अनुभव चांगलाशाळेत पाठ्यपुस्तकातून शिकलेले प्रयोग करताना खूप मजा आली. मला या प्रयोगासाठी माझ्या बाबांनी खूप मदत केली. प्रयोग करत असताना पडणाऱ्या छोट्या- छोट्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याशी संवाद साधला असता मिळत गेली आणि मी हा प्रयोग पूर्ण करू शकलो. आज या स्पर्धेत सहभाग घेऊन मला खूप चांगले वाटत आहे. तसेच असे प्रात्यक्षिक करण्यास मिळाले, ज्यामुळे मला वीजनिर्मिती कशी होते हे समजले. -पूर्वांक महेश गडेप्रेरणा मिळालीया स्पर्धेत मी पहिल्यांदाच प्रात्यक्षिक केले. सोल्ड्रिंग करण्याचा चांगला अनुभव आला. या प्रात्यक्षिक स्पर्धेतून मला खूप काही नवीन शिकायला मिळाले. या स्पर्धेतील हे मॉडेल तयार करण्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली होती. त्यातील शेवटचे ५ ते ६ दिवस दिवसभर काम केले. इंटरनेटच्या साहाय्याने मला खूप माहिती मिळवता आली. -सार्थ संदीप पंडित