विंडमिल कॉम्पिटिशनचे बक्षीस वितरण
By Admin | Updated: September 1, 2014 00:43 IST2014-09-01T00:39:40+5:302014-09-01T00:43:37+5:30
औरंगाबाद : विंडमिल (अ हॅण्डस् आॅन सायन्स अॅक्टिव्हिटी कॉम्पिटिशन-२०१४) चे बक्षीस वितरण डॉ. आनंद कर्वे यांच्या हस्ते करण्यात आले.

विंडमिल कॉम्पिटिशनचे बक्षीस वितरण
औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आणि संडे सायन्स स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विंडमिल (अ हॅण्डस् आॅन सायन्स अॅक्टिव्हिटी कॉम्पिटिशन-२०१४) चे बक्षीस वितरण डॉ. आनंद कर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाहुणे म्हणून मोहन सिरके, खेमराज हिंगणकर, नीरज ज्योतिषी, सुभाष चांदणे, सुयश डाके, प्राचार्या सुनयना अवस्थी, प्राचार्य सुभाष धवन, सतीश गौर, बी. जी. गायकवाड यांची उपस्थिती होती.
स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी तापडिया नाट्यमंदिरामध्ये उत्साहात पार पडले. या सोहळ्यात डॉ. आनंद कर्वे यांनी नवविचार, नवकल्पना आणि नवनिर्मिती या विषयावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, गरज निर्माण झाल्यास विचारमंथन आणि तर्कशास्त्रातून नवे शोध लागतात. विद्यार्थ्यांनी देशापुढील समस्या कोणत्या आहेत हे पाहून संशोधन करावे. कोणत्याही क्षेत्रात नवे विचार मांडता येतात. बुद्धांनी सर्व मानव समान असल्याचा नवा विचार प्रथम मांडला आणि समाजात बदल झाले. नवे विचार मांडताना सखोल माहिती घेऊन प्रयोगांच्या माध्यमातून येणारा अनुभव प्रचलित सिद्धांताशी सुसंगत आहे का हे तपासून पाहिल्यानंतर विचार मांडावेत. स्पर्धा कृतीतून विज्ञान शिका ही संकल्पना समोर ठेवून २० आॅगस्ट रोजी नॅशनल अक्षय ऊर्जा दिनानिमित्त २४ आॅगस्ट रोजी लोकमत भवन येथे स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत ९ ते ११ वयोगटातील आणि १२ ते १५ वयोगटातील एकूण ९०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये पवन ऊर्जा आणि पवनचक्कीच्या साह्याने जास्तीत जास्त एलईडी लाईट लावणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड दुसऱ्या फेरीसाठी करण्यात आली. संचालन शीतल लड्डा यांनी केले. स्पर्धेत पहिल्या गटातून प्रथम- दुर्वांक गाडे, द्वितीय- विराज देवसाळे, तृतीय- प्रथम कालघुटकर, दुसऱ्या गटातून प्रथम -सार्थ पंडित, द्वितीय- मयूर भोसले, तृतीय- हार्दिक खंडागळे, उत्तेजनार्थ- सोमेश बगाडिया, पंकज बेद्रे, नीरज राजे, रजत गाडे, वेदांत भाले, शाबाज खान, ऋषिकेश देशपांडे, अभिजित सोमाणी, दिव्या दायमा, सफल सोनी, रंजन खजाने, वेदांत महाजन, मधुर देव, अथर्व सोने, ऋतुजा बेंबडे, फाल्गुन वायकोळे, वेदांत दुबे, अनिकेत सूर्यवंशी, सोहम तिळवणकर, मिहिर पाटील, ऋतुजा भारती, प्रेम सुगंधी, अभय वाकळे, युवराज गिरी, विशेष बक्षीस- प्रियांशू शिंदे, ऋत्विक गायकवाड, अभिषेक मोरे, समीक्षा बोडके, नवीन मीना यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.