विजेच्या धक्क्याने लाईनमन कोसळला
By Admin | Updated: May 22, 2014 00:36 IST2014-05-22T00:20:05+5:302014-05-22T00:36:05+5:30
औंढा नागनाथ : दुरूस्तीच्या कामात मग्न असताना एकीकडून विज आल्याने बसलेल्या शॉकमध्ये खांबावरून कोसळल्याने लाईनमन गंभीर जखमी झाला आहे.

विजेच्या धक्क्याने लाईनमन कोसळला
औंढा नागनाथ : दुरूस्तीच्या कामात मग्न असताना एकीकडून विज आल्याने बसलेल्या शॉकमध्ये खांबावरून कोसळल्याने लाईनमन गंभीर जखमी झाला आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे २१ मे रोजी दुपारी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार औंढा तालुक्यातील गोजेगाव येथे विद्युत दुरूस्तीचे काम सुरू आहे. बुधवारी साळणा वीज उपकेंद्रातंर्गत कार्यरत असलेले लाईनमन सनी बाबुराव भाग्यवंत (वय २४) दुरूस्तीसाठी खांबावर चढले होते. एकीकडून वीज बंद केली असताना दुसरीकडून वीज आल्याने सनी भाग्यवंत यांना शॉक बसला. त्यामुळे जवळपास २० फुटांच्या खांबावरून कोसळल्याने भाग्यवंत गंभीर जखमी झाले. सुरूवातीला औंढा येथील ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिष दराडे यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी भाग्यवंत यांना हिंगोलीतील सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तेथे वैद्यकिय अधिकारी त्यांच्यावर उपचार करीत आहेत. (वार्ताहर)