दीड हजार वाहनांवर विनानोंदणी क्रमांक
By Admin | Updated: August 20, 2014 00:47 IST2014-08-20T00:26:42+5:302014-08-20T00:47:13+5:30
औरंगाबाद : चॉईस नंबरसाठी आरटीओ कार्यालयात पैसे भरल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता न करताच वाहनांवर नंबर लावून शहरातील रस्त्यांवर गेल्या दोन वर्षांपासून जवळपास १५०० वाहने धावत असल्याची शक्यता आहे.

दीड हजार वाहनांवर विनानोंदणी क्रमांक
औरंगाबाद : चॉईस नंबरसाठी आरटीओ कार्यालयात पैसे भरल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता न करताच वाहनांवर नंबर लावून शहरातील रस्त्यांवर गेल्या दोन वर्षांपासून जवळपास १५०० वाहने धावत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा वाहनधारकांना आरटीओ कार्यालयाकडून लवकरच पत्र पाठवून कागदपत्रांची पूर्तता करण्याची सूचना केली जाणार आहे.
आरटीओ कार्यालयातील सिस्टीममध्ये विविध सिरीजमधील जवळपास १५०० क्रमांक ब्लॉक दाखवित आहेत. नवीन वाहन घेण्यापूर्वी चॉईस नंबरसाठी पैसे भरल्यानंतर प्राथमिक पावतीच्या आधारेच वाहनांवर क्रमांक टाकण्यात आले. वाहनांची कागदपत्रे, टॅक्स जमा करण्याकडे दुर्लक्ष केले गेले. गेल्या दोन वर्षांत वाहनधारक कागदपत्रे जमा करण्यासाठी येईल, केवळ याचेच वाटप पाहण्यात आले. यामुळे सिस्टीममधील ब्लॉक दाखविणारे हे १५०० क्रमांक अन्य वाहनधारकांसाठीही उपलब्ध करून देता येत नसल्याची अडचण येत आहे. त्यामुळे आता अशा वाहनधारकांनी कागदपत्रांची पूर्तता करावी, यासाठी लवकरच आरटीओ कार्यालयाकडून पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. तसेच नवीन वाहन नोंदणीसाठी डीलर प्रतिनिधी, प्राधिकृत प्रतिनिधी नोंदणी क्रमांकासाठी मोटार वाहन निरीक्षक, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आणि डिस्क्लेमर वाहन प्रणालीत तपासणी झाल्यानंतर संबंधित कागदपत्रे वाहन क्रमांक देण्यासाठी जमा करणे बंधनकारक आहे; परंतु नोंदणी क्रमांक आरक्षित न करता वितरक प्रतिनिधी, मालक कागदपत्रे स्वत: जवळ ठेवतात. यामुळे नोंदणी क्रमांक देता येत नाही. हवा असलेला नोंदणी क्रमांक जवळ आल्यास संबंधित कागदपत्रे जमा केली जात असल्याचेही समोर आले आहे.