रेल्वेस्थानकांत होणार स्वयंचलित जिना?
By Admin | Updated: December 5, 2014 00:50 IST2014-12-05T00:27:36+5:302014-12-05T00:50:36+5:30
जालना : येथे होत असलेल्या मॉडेल रेल्वेस्थनकांत आता दादऱ्यावर चढ-उतार करण्यासाठी स्वयंचलित जिना (एक्सीलेटर) बसविण्यात येणार आहे.

रेल्वेस्थानकांत होणार स्वयंचलित जिना?
जालना : येथे होत असलेल्या मॉडेल रेल्वेस्थनकांत आता दादऱ्यावर चढ-उतार करण्यासाठी स्वयंचलित जिना (एक्सीलेटर) बसविण्यात येणार आहे. याचा वयोवृद्ध नागरिकांना फायद्यासोबतच प्रवाशांचा चढ -उताराचा वेळ वाचणार आहे.
त्याचबरोबर प्रवाशांवर नजर ठेवण्याबरोबरच काही अनुचित घटना अथवा कोणती वस्तू ठेवू नये म्हणून चौफेर नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक असे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
हे काम लवकरच सुरु होणार आहे. एक्सीलेटर बसविण्याच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होताच मोठ्या शहरातील रेल्वेस्थानकाप्रमाणे अत्याधुनिक अशा स्वयंचलित पायऱ्या कार्यान्वित होणार आहेत. जालना रेल्वेस्थानकात दोन्ही बाजूनी दादरे आहेत.
मात्र वयोवृद्ध प्रवाशांसोबतच सर्वचजण दादार चढण्यास अनेकदा टाळाटाळ करतात. सर्वच प्रवाशांना सहजपणे दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी या पायऱ्या महत्वपूर्ण ठरणार आहेत.
रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाकडून प्रक्रिया पूर्ण होत आहे. यासाठी जागेची पाहणी तसेच इतर बाबी लवकरच होणार आहेत.
पायऱ्यांसोबतच सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेले कॅमेरेही बसविण्यात येणार असल्याचे रेल्वेस्थानकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सर्वच फलाटावर अत्याधुनिक असे हे कॅमेरे चोवीस होणाऱ्या घडामोडी टिपणार आहेत. प्रवेशद्वारासह फलाटावर हे कॅमेरे असणार आहेत. (प्रतिनिधी)४
स्थानकांत सर्वच फलाटावर सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मॉडेल स्थानकातील राहिलेली कामेही लवकरच पूर्ण होणार असल्याचे रेल्वे स्थानकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.