लवकरच जागा ताब्यात मिळणार
By Admin | Updated: July 26, 2014 00:36 IST2014-07-25T23:40:43+5:302014-07-26T00:36:05+5:30
पाथरी : नवोदय विद्यालयाच्या धरतीवर सुरू करण्यात आलेल्या पाथरी येथील मॉडेल स्कूलसाठी प्रस्तावित करण्यात आलेली जागा लवकरच ताब्यात घेऊन

लवकरच जागा ताब्यात मिळणार
पाथरी : नवोदय विद्यालयाच्या धरतीवर सुरू करण्यात आलेल्या पाथरी येथील मॉडेल स्कूलसाठी प्रस्तावित करण्यात आलेली जागा लवकरच ताब्यात घेऊन या ठिकाणी इमारत बांधकाम केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार देवीदास गाढे यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली़
पाथरी येथील मॉडेल इंग्लीश स्कूलचा दुसरा स्थापना दिवस २३ जुलै रोजी साजरा करण्यात आला़ अध्यक्षस्थानी तहसीलदार देवीदास गाढे, प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी डी़ आऱ रणमाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक साईनाथ आव्हाड, डॉ़ मुदगलकर, शिक्षण विस्तार अधिकारी अंकुश फंड, गोरे, सदाशिव थोरात यांची उपस्थिती होती़ मॉडेल इंग्लीश स्कूलच्या स्थापना दिनानिमित्त पालक सभाही घेण्यात आली़
पालकांनी आपल्या समस्या मांडल्या़ या प्रसंगी समितीचे अध्यक्ष तहसीलदार देवीदास गाढे यांनी मॉडेल इंग्लीश स्कूल जुन्या इमारतीतून यावर्षी नवीन इमारतीमध्ये तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले़ त्यानंतर शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागला असून, ही जागा लवकरच ताब्यात घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले़
गटशिक्षणाधिकारी रणमाळे यांनी शैक्षणिक बाबींवर माहिती देताना शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी लागणारी सर्व ती मदत करण्याचे व शासनाच्या सोयी, सुविधा पुरविण्याबाबत व्यक्तीश: लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले़ प्रास्ताविक प्राचार्य जे़डी़ कुलकर्णी यांनी केले़
पालक प्रतिनिधी म्हणून सदाशिव थोरात यांनी मनोगत व्यक्त केले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी आहेरकर व साक्षी खरात यांनी केले़ नेहा थोरात यांनी आभार मानले़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी एम़ डी़ मडके, एम़ ए़ सय्यद, बिसमिल्ला खान, सी़ डी़ गुंजकर, गोविंद रासवे, बालाजी कोल्हे यांनी परिश्रम घेतले़ (वार्ताहर)