शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

मुख्यमंत्री, रेल्वेमंत्र्यांमार्फत रेल्वेचे प्रश्न सोडवणार; मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचा निर्धार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 18:20 IST

मराठवाड्यातील रेल्वेविषयक प्रलंबित प्रश्नांमध्ये लक्ष घालून ते मार्गी लागण्यासाठी आधी राज्याचे मुख्यमंत्री व नंतर रेल्वेमंत्र्यांना भेटून प्रयत्न करण्याचा निर्धार आज मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या बैठकीत करण्यात आला.

औरंगाबाद : मराठवाड्यातील रेल्वेविषयक प्रलंबित प्रश्नांमध्ये लक्ष घालून ते मार्गी लागण्यासाठी आधी राज्याचे मुख्यमंत्री व नंतर रेल्वेमंत्र्यांना भेटून प्रयत्न करण्याचा निर्धार आज मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या बैठकीत करण्यात आला. ही बैठक मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली व मंडळाचे सदस्य सचिव डी.एम. मुगळीकर व जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळाच्या सभागृहात पार पडली. 

मागण्या अनेक असल्या तरी प्राधान्यक्रमाने तीन-चारच मागण्यांवर भर द्यावा, असेही ठरले. प्राधान्यक्रमाच्या या मागण्या अशा- औरंगाबाद- चाळीसगाव हा ९०० कि.मी.चा रेल्वेमार्ग रद्द होता कामा नये. उलट या मार्गासाठी भरीव आर्थिक तरतूद करून गती देण्यात यावी, रोटेगाव-कोपरगाव हा २२ कि.मी.चा मार्गही लवकरात लवकर पूर्ण करावा, औरंगाबाद ते मुंबई या मार्गावर गाड्यांची संख्या वाढावी यासाठी चिकलठाणा येथील रेल्वे बोर्डाच्या जागेवर पीटलाईन मंजूर करण्यात यावी, यातील तांत्रिक अडचणी बाजूला सारून ही पीटलाईन झालीच पाहिजे, मराठवाड्याचा समावेश दक्षिण मध्यमधून मध्य रेल्वेत करण्यात यावा, मुंबई ते मनमाड या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्या रात्री मनमाडला मुक्कामी असतात, त्या गाड्यांचा मुक्काम औरंगाबादला हलविण्यात यावा, जेणेकरून औरंगाबाद ते मुंबई या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढेल. येत्या १५ दिवसांत मुख्यमंत्री व रेल्वेमंत्र्यांना भेटण्याचे नियोजन करून शिष्टमंडळ नेण्यात येईल, असे डॉ. कराड यांनी जाहीर केले. 

या बैठकीस औरंगाबाद दमरेचे सहायक अभियंता विजयकुमार खोबरे, प्रभाग अभियंता उदय यादव, कन्नडच्या नगराध्यक्षा स्वाती कोल्हे, संतोष कोल्हे, तसेच रेल्वे प्रश्नांचा पाठपुरावा करणारे ओमप्रकाश वर्मा, अनंत बोरकर, जि.प. सदस्य एल.जी. गायकवाड, जि.प.चे माजी अध्यक्ष अण्णा शिंदे, गोपीनाथ वाघ,  संजय खंबायते, डॉ. संजय गव्हाणे, मोहंमद मुश्ताक, राजेश महेता, संतोष भाटिया, दामोदर पारीख, प्रा. आर.जी. लहाने, वर्धमान जैन, चंद्रकांत मेने, नितीन अमृतकर, कल्याण जंजाळ, सुरेश राऊत, प्रल्हाद पारटकर, वैभव सातपुते, ब.द. जटाळे, संजय भर्गोदेव, अनिल भारसाखळे आदींनी या चर्चेत भाग घेतला. यावेळी प्रवासी संघटना, वैजापूर, कन्नड तालुक्यातर्फे डॉ. अण्णा शिंदे, मराठवाडा रेल्वे विकास समितीतर्फे ओमप्रकाश वर्मा आदींनी डॉ. कराड यांच्याकडे निवेदने सादर केली.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनMarathwadaमराठवाडा