शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
6
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
7
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
8
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
9
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
10
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
11
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
12
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
13
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
14
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
15
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
16
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
17
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
18
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
19
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
20
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी

संदीपान भुमरेंचे विमान उडणार का ? शिरसाटांच्या कार्यालयात 'टेक ऑफ'ची तयारी

By बापू सोळुंके | Published: April 09, 2024 2:14 PM

उमेदवार कोणीही असो, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढविणार असल्याचा दावा संदीपान भुमरे यांनी केला.

छत्रपती संभाजीनगर : महायुतीमध्ये मोजक्याच जागांवरून रस्सीखेच सुरू आहे, यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर शिंदेसेना आणि भाजपकडून दावा करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी पक्की झाल्याची चर्चा सुरू आहे. सोमवारी आ. संजय शिरसाट यांच्या कोकणवाडी चौकातील संपर्क कार्यालयातील विमानाच्या आकाराच्या केबिनमध्ये निवडणूक तयारीची बैठक घेऊन भुमरे यांच्या दिल्लीवारीची तयारी करण्यात आली.

उमेदवार कोणीही असो, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढविणार असल्याचा दावा पालकमंत्री भुमरे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. त्यांनी बोलावलेली बैठक आणि त्यांच्या बोलण्यातील आत्मविश्वास यावरून तेच लोकसभेचे उमेदवार असतील, असे दिसून येत आहे. शिवसेनेचे प्रवक्ता आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जयस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, रमेश पवार आणि भरत राजपूत यांची उपस्थिती होती. पालकमंत्री भुमरे म्हणाले की, औरंगाबाद लोकसभेची सीट शिवसेनेचीच आहे. उमेदवार कोण द्यायचा, याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. येथील जागा वाटप अद्याप झाले नाही. तरी महायुतीचा उमेदवार कुणीही असो; तो आम्ही निवडून आणणारच आहोत. निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी आजची बैठक असल्याचे ते म्हणाले. अदालत रोडवरील जुन्या अशोका हॉटेलच्या जागेवर पक्षाचे प्रचार कार्यालय उघडले जाणार आहे. दोन दिवसांत उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तुमची उमेदवारी जाहीर होणार का, असे विचारले असता भुमरे म्हणाले की, शिंदे हेच उमेदवारी घोषित करतील; पण तिकीट कुणाला मिळणार, हे अद्याप आम्ही कोणीही सांगू शकत नाही.

ऐनवेळी बदलले बैठकीचे स्थळभुमरे यांच्या गारखेडा सूतगिरणी चौकातील संपर्क कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व आमदार आणि जिल्हाप्रमुखांना तेथेच बोलावण्यात आले होते. मात्र, भुमरे यांच्या कार्यालयात त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असल्याचे पाहून भुमरे यांनी बैठक आ. शिरसाट यांच्या कार्यालयात घेऊ असे सांगून ते स्वत: कोकणवाडी चौकातील शिरसाट यांच्या कार्यालयात दाखल झाले. तेथेच विमानाच्या आकाराच्या केबिनमध्ये ही बैठक पार पडली.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४aurangabad-pcऔरंगाबादSandipan Bhumreसंदीपान भुमरे