शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

विखेंनी आणलेले वाळूडेपो धोरण गुंडाळणार? डेपोंची तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:45 IST

१५ दिवसांत नवीन वाळू धोरण जाहीर होईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे सर्व वाळूडेपोंची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला शासनाने दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आणलेले वाळूडेपो धोरण विद्यमान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गुंडाळणार असल्याची चर्चा महसूल प्रशासनात आहे. शासनाने सध्याच्या वाळू डेपोंची तपासणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून, १४ जानेवारीपर्यंत त्याचा अहवाल प्रशासनाला द्यावा लागणार आहे. सध्याच्या धोरणातील त्रुटी, वाळूपुरवठा सामान्यांना होतो की नाही, या बाबींचा अंतर्भाव त्या अहवालात असण्याची शक्यता आहे.

१५ दिवसांत नवीन वाळू धोरण जाहीर होईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे सर्व वाळूडेपोंची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला शासनाने दिले आहेत. वाळू डेपोंना घालून दिलेल्या अटी, शर्तींचे पालन होते की नाही का, अटी, शर्तींचा भंग होत आहे काय, याची तपासणी प्रशासन करणार आहे. याचा अहवाल १४ जानेवारीपर्यंत देण्याची मुदत असून गौण खनिज अधिकारी आणि कर्मचारी वाळू डेपोंच्या तपासणीला लागले आहेत.

विखेंनी आणलेले धोरण असे...तत्कालीन महसूलमंत्री विखे यांनी वाळू डेपोचे धोरण आणले. त्यामध्ये वाळूचे लिलाव रद्द करून त्या ठिकाणी शासनामार्फतच वाळू डेपो उघडून नागरिकांना स्वस्तात वाळूविक्रीची तरतूद होती. जिल्ह्यात चार डेपो उघडून त्यातून वाळू विक्री केली. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी या धोरणात सुधारणा करून वाळू डेपोचा खर्च ग्राहकांच्या माथी मारला. त्यामुळे स्वस्तात मिळणारी वाळू महाग झाल्याने मुख्य धोरणाला तडा गेला आणि वाळू विक्रीला ब्रेक लागला.

डेपो धोरणाला का दिली स्थगिती?डेपोची मुदत संपल्यानंतरही वाळू शिल्लक राहिली. त्यामुळे विक्रीसाठी दोन वेळा मुदतवाढ दिली, मात्र त्यानंतरही वाळू शिल्लक राहिली. या वाळू धोरणामध्ये शासनाचा महसूल तर बुडालाच आहे, शिवाय शासनालाच डेपो चालकांना उत्खनन आणि वाहतुकीचे पैसे द्यावे लागणार असल्यामुळे विद्यमान महसूलमंत्री बावनकुळे यांनी वाळूडेपो धोरणाला स्थगिती दिल्याची चर्चा आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग