विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही-लोणीकर
By Admin | Updated: June 17, 2016 00:36 IST2016-06-16T23:53:38+5:302016-06-17T00:36:38+5:30
जालना: जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ साठीचा सर्वसाधारण आराखडा २५७ कोटी २८ लक्ष रूपये खर्चाचा आहे. राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे जालना जिल्ह्याचा विविध

विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही-लोणीकर
जालना: जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ साठीचा सर्वसाधारण आराखडा २५७ कोटी २८ लक्ष रूपये खर्चाचा आहे. राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे जालना जिल्ह्याचा विविध योजनेच्या माध्यमातून सर्वतोपरी विकास करण्यात येणार आहे, यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे, प्रतिपादन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात गुरूवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य एस.ए.नागरे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र्र जगताप यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र्र जगताप यांनी २०१५-१६ च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाचा तपशीलवार खर्च सादर केला. तसेच २०१६-१७ च्या शासनाने मंजुरी दिलेल्या आराखड्याचा क्षेत्रिनहाय तपशील सर्वसाधारण १९०८२.०० लक्ष रूपये, अनुसूचित जाती ६३९४ लक्ष रूपये, ओ.टी.एस.पी २५२.८० लक्ष रूपये असे एकूण २५७२८.८० लक्ष रु पयांचा आराखडा जिल्हयासाठी मंजूर झालेला आहे. त्यात प्रामुख्याने सर्वसाधारण आराखड्यात १९०८३ लक्ष रूपयांपैकी ३५८५ लक्ष रु पयांचा निधी जलयुक्त शिवार कामासाठी तर१०४० लक्ष रूपयांचा निधी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी राखीव ठेवण्यात आला असल्याचे यावेळी नमुद केले.
पालकमंत्री बबनराव लोणीकर पुढे म्हणाले २०१५-१६ साठीचा जिल्हा वार्षिक योजनेसाठीचा निधी संपूर्ण खर्च केल्यामुळे लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनास धन्यवाद देऊन २०१६.१७ साठीचा जिल्हा वार्षिक योजनेचा २५७ कोटी २८ लक्ष रूपयांच्या मंजूर निधी जिल्ह्याच्या विकासासाठी खर्च करताना संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखाने विविध विकासाची कामाचा प्रस्ताव सादर करताना लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार व संबंधित सदस्यास विश्वासात घेऊन प्रस्ताव तयार करु न तात्काळ जिल्हा प्रशासनास सादर करावयाचे नमुद करून यावेळी जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्यात आला आहे. सर्व यंत्रणांनी जाणीव पूर्वक कामे पूर्ण करावी असे लोणीकर म्हणाले.ग्रामीण भागातील जनतेची कामे वेळेत व जलदगतीने होण्यासाठी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी व कर्ज वाटपा बाबत जिल्हा व तालुकास्तरावर कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
ग्रामीण भागातील जनतेला कायमस्वरु पी पाणी उपलब्ध करु न देण्यासाठी शासन जलयुक्त शिवार अभियान राबवित आहे. या अभियानाच्या माध्यमातून गाव परिसरात नदी खोलीकरण, रु ंदीकरण, सिमेंट नाला बांध, समतमल चर, बरोबरच जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत.
४या कामामुळे जलसाठा वाढवून त्याचा फायदा गावातील जनतेला होणार असून २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यातील १८६ गावात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत मोठया प्रमाणात कामे करण्यात येऊन या कामासाठी उपविभागीय अधिकारी यांना विशेष अधिकार देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे आमदार संतोष दानवे यांनी तीर्थक्षेत्र विकास, पाणी टंचाई, रस्ते विकास, जलयुक्त शिवार कामाबाबत तसेच शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत उपयुक्त सूचना केल्या.