शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी वृक्ष तोडणार नाही तर लावणार; मुख्यमंत्री ठाकरेंनी केले स्पष्ट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 15:05 IST

प्रियदर्शनी गार्डनमध्ये झाड तोडणार नव्हे आणखी झाडे लावणार

ठळक मुद्देपरिसरात जांभूळ व चाफ्याची झाडे लावण्यात येतील. १७ एकर जागेवर प्रियदर्शनी गार्डन आहे.

औरंगाबाद : सिडकोतील एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी गार्डनमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या १७ एकर परिसरात असणारे ८६७० झाडांना तोडण्यात येणार नाही. उलट या ठिकाणी जांभूळ व चाफ्याची झाडे लावण्यात येतील. जांभूळबन तयार करण्यात येईल, जेणे करुन झाडांची संख्या वाढेल व पक्षी येतील, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे दिले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे शहरात आले आहेत. दोन दिवसीय दौऱ्यात त्यांनी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता सिडको परिसरातील नियोजित बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या ठिकाणी भेट दिली. एमजीएम हॉस्पिटल परिसरातील १७ एकर जागेवर प्रियदर्शनी गार्डन आहे. येथे निलगिरीचे व अन्य असे सुमारे ८६७० झाडे आहेत. याच ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांची भव्यदिव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. याची पाहणी उद्धव ठकारे यांनी केली. यावेळी त्यांच्या सोबत उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजय महेता,  महापौर नंदकुमार घोडेले, दिल्ली व मुंबई येथील प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंसीचे अधिकारी , आर्किटेक्ट यांची उपस्थिती होती.  

यावेळी स्मारक व परिसराचा विकास कामाच्या नकाशाची काहीवेळ माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पहिलेच स्पष्ट केले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारताना गार्डनमधील एकही झाड तोडण्यात येणार नाही. या ठिकाणी निलगीरीसह अन्य झाडे आहे. तिथे जांभूळबनाच्याधर्तीवर जाभांळाची तसेच चाफाची झाडेही लावण्यात येणार आहे. जेणे करुन झाडावर पक्षीही येतील.स्मारकासाठी दोन ठिकाणी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात पालकमंत्री देसाई यांनी  अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एक जागा निश्चित करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारका सोबतच आर्ट गॅलरी असणार आहे. त्यांनी काढलेले व्यंगचित्र,त्यांनी वापरलेल्या वस्तूंचा त्यात समावेश असणार आहे.  यावेळी मनपाचे अधिकारी, अनेक शिवसैनिकही हजर होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका