शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या संतभूमीला एक‘नाथ’ पावणार का? विकासाचा कालबद्ध कार्यक्रम ठरला ‘कालबाह्य’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 12:25 IST

मराठवाड्याच्या विकासाचा ५० हजार कोटींच्या तरतुदींचा कालबद्ध कार्यक्रम अंमलबजावणीअभावी ‘कालबाह्य’ ठरला आहे.

- नंदकिशोर पाटीलऔरंगाबाद : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत असून नावातच ‘नाथ’ असलेल्या या एकनाथांकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसह अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

राज्यातील सत्तांतरात मराठवाड्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या दोन मंत्र्यांसह नऊ आमदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले. मुख्यमंत्र्यांच्या दोन दिवसीय कार्यक्रमपत्रिकेवर नजर टाकली तर बंडखोर आमदारांना पाठबळ देण्यासाठीच या दौऱ्याची आखणी करण्यात आल्याचे दिसून येते; परंतु, मुख्यमंत्र्यांनी या भागातील विकासविषयक प्रश्न मार्गी लावावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कालबद्ध कार्यक्रम ठरला ‘कालबाह्य’संयुक्त महाराष्ट्रात मराठवाडा बिनशर्त सामील झाला. मात्र नागपूर करारातील अटींची पूर्तता राज्य सरकारने न केल्यामुळे या प्रदेशाचे मागासलेपण दूर झालेले नाही. मराठवाड्यात दरवर्षी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणे अपेक्षित असताना गेल्या पाच वर्षांत या बैठकीला मुहूर्त मिळालेला नाही. मागील १३ वर्षांत फक्त दोन बैठका झाल्या. ४ ऑक्टोबर २०१६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलेला मराठवाड्याच्या विकासाचा ५० हजार कोटींच्या तरतुदींचा कालबद्ध कार्यक्रम अंमलबजावणीअभावी ‘कालबाह्य’ ठरला आहे.

तरतूद मोठी, गंगाजळी छोटी-मराठवाड्यातील अनेक सिंचन प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. ३८ छोट्या-छोट्या प्रकल्पांसाठी १०४८ कोटी देण्याची घोषणा झाली होती पैकी छदामही मिळाला नाही. लोअर दुधना प्रकल्प निधीसाठी ३८ वर्षे रखडला. ३६ हजार ५०० विंधन विहिरींपैकी फक्त सध्या ७ हजार विहिरींची कामे झाली. कृष्णा खोऱ्यात सध्या जे पाणी उपलब्ध आहे, ते मराठवाड्याला मिळण्यासाठी ४ हजार ८०० कोटींच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली होती. परंतु अजूनही २१ टीएमसी पाणी पूर्ण क्षमतेने मराठवाड्याला मिळत नाही.

बीड-परळी रेल्वेमार्गाची कासवगती -नगर-परळी व वर्धा-नांदेड या दोन रेल्वेमार्गांसाठी ५ हजार ३२६ कोटींची तरतुदीची घोषणा केली. त्यातील नगर-बीड- परळी हा मार्ग मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होईल असे जाहीर केले होते. अद्याप हे काम पूर्ण झाले नाही.

विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार-औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे हे विमानतळ आंतरराष्ट्रीय होईल व येथे कुठलेही विमान उतरू शकेल. त्याचप्रमाणे नांदेड विमानतळासाठी अर्थसाहाय्य करण्याची घोषणा हवेत विरली आहे.

या प्रकल्पांकडे लक्ष द्या-डीएमआयसीत भांडवली गुंतवणुकीचे उद्योग- जालना येथील फूड पार्कला कधी मुहूर्त लागणार?- परभणी, बीड, नांदेड येथे टेक्स्टाईल पार्क-जालना येथे सीड पार्क स्थापन करणे- शेळीगट व संकरित गायी पायलट प्रोजेक्ट-मराठवाडा वॉटर ग्रीड योजना ठप्प-जलसंधारण आयुक्तालय नावालाच

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद