शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
2
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
3
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
4
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
5
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
6
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
7
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
8
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
9
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
10
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
11
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
12
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
13
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
14
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
15
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
16
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
17
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
18
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
19
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
20
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या अनुदान योजनेसाठी नवलेखक उत्साह दाखवतील का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 17:14 IST

मराठी साहित्याची गौरवशाली परंपरा पुढे चालविण्यासाठी नवनवीन साहित्यिक लिहिते होणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून मराठी भाषेबद्दल नेहमीच ‘शाब्दिक’ जिव्हाळा बाळगणारे राज्य शासनदेखील कार्यपरिहार्यतेतून का होईना, पण दरवर्षी नवलेखकांसाठी अनुदान देते; मात्र नवलेखक दरवेळीच या योजनेकडे पाठ फिरवताना दिसतात. 

ठळक मुद्देराज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे नवीन लेखकांच्या पहिल्या प्रकाशनासाठी उत्तेजनार्थ ‘नवलेखक अनुदान योजना’ राबवली जाते. या योजनेकरिता सन २०१८ वर्षासाठी १ ते ३१ जानेवारीदरम्यान अर्ज मागविण्यात येत आहेत;मात्र गेल्या दोन वर्षांत उणेपुरे शंभर अर्जदेखील आले नसल्याने या योजनेच्या यशस्वीतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

औरंगाबाद : मराठी साहित्याची गौरवशाली परंपरा पुढे चालविण्यासाठी नवनवीन साहित्यिक लिहिते होणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून मराठी भाषेबद्दल नेहमीच ‘शाब्दिक’ जिव्हाळा बाळगणारे राज्य शासनदेखील कार्यपरिहार्यतेतून का होईना, पण दरवर्षी नवलेखकांसाठी अनुदान देते; मात्र नवलेखक दरवेळीच या योजनेकडे पाठ फिरवताना दिसतात. 

राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे नवीन लेखकांच्या पहिल्या प्रकाशनासाठी उत्तेजनार्थ ‘नवलेखक अनुदान योजना’ राबवली जाते. या योजनेकरिता सन २०१८ वर्षासाठी १ ते ३१ जानेवारीदरम्यान अर्ज मागविण्यात येत आहेत; मात्र गेल्या दोन वर्षांत उणेपुरे शंभर अर्जदेखील आले नसल्याने या योजनेच्या यशस्वीतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

योजनेला मिळणारा अत्यल्प प्रतिसाद नेहमीच चिंतेचा विषय राहिलेला आहे. २०१६ साली नवलेखक अनुदान योजनेकरिता केवळ ४८ अर्ज, तर २०१७ साली ७३ अर्ज आले होते. मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी पुढील वर्षी २०० अर्ज तरी यावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. यंदा तरी ती पूर्ण होईल का, हा खरा प्रश्न आहे. या योजनेंतर्गत एकही पुस्तक प्रकाशित न झालेल्या लेखकाच्या ललित व ललितेतर साहित्याचा विचार केला जातो. कवितासंग्रह, कथासंग्रह, नाटक/एकांकिका, कादंबरी, बालवाङ्मय, इतर वैचारिक, तसेच चरित्र आत्मचरित्र, प्रवासवर्णनात्मक  स्वरूपाचे लेखन अशा विविध साहित्य प्रकारातील प्रथम प्रकाशनासाठी अनुदान दिले जाते. विशेष म्हणजे केवळ ५०० प्रतींसाठी हे अनुदान असते. या ५०० प्रती छापण्यासाठी मंडळाकडून ठरवून दिलेल्या प्रकाशननिर्मिती खर्चाच्या

केवळ ७५ टक्के अनुदान देण्यात येते.अर्ज केलेल्या नवलेखकांच्या सहित्याची त्या-त्या साहित्य प्रकारातील तज्ज्ञांकडून तपासणी करून त्यांचा अभिप्राय घेतला जातो. त्यांची अनुकूलता मिळाल्यास किमान एका वर्षाच्या आत अनुदानविषयक निर्णय घेण्यात येतो. अनुदानास पात्र ठरलेल्या पुस्तकाच्या नवलेखकाला मंडळाने ठरवून दिल्याप्रमाणे प्रकाशकांकडून वाङ्मय प्रकारानुसार ७५० ते १५०० रुपये मानधन देण्यात येते.

यंदा २०० अर्जांची इच्छायोजनेला मिळणारा अत्यल्प प्रतिसाद नेहमीच चिंतेचा विषय राहिलेला आहे. २०१६ साली नवलेखक अनुदान योजनेकरिता केवळ ४८ अर्ज, तर २०१७ साली ७३ अर्ज आले होते. मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी पुढील वर्षी २०० अर्ज तरी यावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. यंदा तरी ती पूर्ण होईल का, हा खरा प्रश्न आहे.

भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरूराज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे देण्यात येणाºया भारतरत्न पं. भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. शास्त्रीय संगीतामध्ये वादन आणि गायन प्रकारात शिक्षण घेणाºया हुशार व गरजू विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते.योजनेंतर्गत दरवर्षी सहा गायक व सहा वादक अशा एकूण १२ विद्यार्थ्यांना दोन वर्षांकरिता प्रतिमाह पाच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १६ जानेवारी असून, नियम व अटी शासनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या आहेत, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

टॅग्स :literatureसाहित्यAurangabadऔरंगाबाद