पतीकडून पत्नीचा खून
By Admin | Updated: August 22, 2014 00:22 IST2014-08-22T00:03:26+5:302014-08-22T00:22:29+5:30
हिमायतनगर :एकंबा ता. हिमायतनगर येथे रागाच्या भरात पतीने पत्नीचा खून केल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

पतीकडून पत्नीचा खून
हिमायतनगर :एकंबा ता. हिमायतनगर येथे रागाच्या भरात पतीने पत्नीचा खून केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला़
कविता कैलास वाघमारे असे मयत विवाहितेचे नाव आहे. घरगुती कारणावरुन आरोपी कैलासचे कविताशी भांडण झाले. रागाच्या भरात कैलासने घरातील कुऱ्हाड उचलली आणि पत्नी कवितावर वार केले. यात कविता जागीच मरण पावल्या. आरोपी कैलास दारुड्या होता. दारुच्या नशेत तो पत्नीला त्रास देत असे. या दांपत्यास दोन मुली, एक मुलगा आहे़ या घटनेची फिर्याद भीमराव उमला जाधव (पोहेकॉ) यांनी दिली़ या प्रकरणी हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी सकाळी गुन्हा दाखल होवून आरोपीस अटक केल्याची माहिती पोहेकाँ बी़ आऱ वाघतकर यांनी दिली़ तपास पोलिस अधिकारी दत्तात्रय कांबळे करीत आहेत़ (वार्ताहर)