शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची डोक्यात दगड घालून हत्या

By admin | Updated: August 23, 2014 00:49 IST

औरंगाबाद : सतत किरकिर करणाऱ्या पत्नीची डोक्यात मोठा दगड टाकून पतीने हत्या केली.

औरंगाबाद : सतत किरकिर करणाऱ्या पत्नीची डोक्यात मोठा दगड टाकून पतीने हत्या केली. ही घटना काल मध्यरात्री चिकलठाणा परिसरातील पटेलनगरात घडली. शमिनाबी हुसैन खान (३०), असे खून झालेल्या माहिलेचे नाव असून, तिचा पती हुसैन खान नूर खान पठाण (३३, रा. पटेलनगर) याला सिडको एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.
घटनेबाबत पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी सांगितले की, आरोपी हुसैन हा पत्नी शमिनाबी आणि तीन मुलांसह पटेलनगरात राहत होता. अ‍ॅपेरिक्षा चालवून तो आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवीत होता. त्याचे वृद्ध आई-वडील करमाडला राहतात. त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कुणी नाही म्हणून आपण गावाकडे जाऊन राहावे, असे हुसैनला वाटायचे; परंतु शमिनाचा गावी जाण्यास विरोध होता. त्यातून त्यांच्यात सतत किरकिर होत असे.
गेल्या काही दिवसांपासून हुसैन हा आजारी असल्याने त्याच्याकडून दररोज काम होत नव्हते. त्यामुळे घरात आर्थिक चणचण भासू लागली होती. त्यामुळे या पती- पत्नीत अधिकच खटके उडू लागले होते. काल दुपारी आई- वडिलांचा विषय निघाल्यानंतर शमिनाने हुसैनसोबत पुन्हा वाद घातला. लग्न झाले तेव्हाच तुमचे आई-वडील माझ्यासाठी मेले, अशा शब्दांत शमिनाने हुसैनला झिडकारले. त्यामुळे सतत किरकिर करणाऱ्या पत्नीची किरकिर आज कायमचीच मिटवून टाकू, असा विचार हुसैनने केला. रात्री नित्याप्रमाणे पत्नी तीन मुलांसह घरात झोपी गेली. तेव्हा हुसैननेही त्यांच्या सोबत झोपेचे नाटक केले. शमिना आणि मुले गाढ झोपी गेल्याचे लक्षात आल्यानंतर मध्यरात्री तो उठला. त्याने एक मोठा दगड आणला आणि शमिनाच्या डोक्यात टाकला. क्षणातच तिचा जीव गेला. आरडाओरड झाल्यानंतर सिडको एमआयडीसी ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी शमिनाचे प्रेत शवविच्छेदनासाठी घाटीत पाठविले. नंतर अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला; परंतु घटनास्थळाची एकंदरीत परिस्थिती पाहिल्यानंतर हा खून हुसैननेच केल्याचे दिसत होते. त्यामुळे संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ‘खाक्या’ दाखविताच अखेर हुसैनने खुनाची कबुली दिली.
चोराने मारल्याचा केला बनाव
पत्नीचा खून केल्यानंतर आता आपण पकडले जाऊ, काय करावे, असा प्रश्न हुसैनसमोर उभा राहिला. तेव्हा स्वत:चा बचाव करण्यासाठी हुसैनने पावणेदोन वाजेच्या सुमारास ‘चोर... चोर...’ अशी आरडाओरड सुरू केली. आवाज ऐकून शेजारीपाजारी धावत आले. तेव्हा घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली शमिनाबी नजरेस पडली. बाजूलाच तिची मुले झोपलेली होती. ‘घरात दोन चोर आले होते. त्यांनी चोरी करताना शमिनाच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला,’ अशी खोटी कथा हुसैनने शेजाऱ्यांना सांगितली. पोलीस आल्यानंतरही त्याने असेच सांगितले; परंतु घटनास्थळाची परिस्थिती पाहिल्यानंतर हा खून हुसैनने केल्याचे आणि आता तो चोर आल्याचा बनाव करीत असल्याचे स्पष्ट झाले.