शिरीष बोराळकरांच्या प्रचारासाठी पत्नी सुषमा मैदानात

By | Updated: November 29, 2020 04:08 IST2020-11-29T04:08:16+5:302020-11-29T04:08:16+5:30

ज्या पुरुषांच्या मागे त्यांची पत्नी ठामपणे उभी असते त्यांचा विजय निश्चित असतो. याचाच प्रत्यय विविध राजकीय मंडळींच्या निवडणुकीत येतो. ...

Wife Sushma in the field for Shirish Boralkar's campaign | शिरीष बोराळकरांच्या प्रचारासाठी पत्नी सुषमा मैदानात

शिरीष बोराळकरांच्या प्रचारासाठी पत्नी सुषमा मैदानात

ज्या पुरुषांच्या मागे त्यांची पत्नी ठामपणे उभी असते त्यांचा विजय निश्चित असतो. याचाच प्रत्यय विविध राजकीय मंडळींच्या निवडणुकीत येतो. सध्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अंतिम टप्यात आली असून, शिरीष बोराळकरांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना यश मिळणार असल्याचा विश्वास सुषमा बोराळकरांनी व्यक्त केला आहे. सुषमा बोराळकरांनी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दौरा केला असून, यादरम्यान अध्यक्ष नितीन पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर त्यांनी बँकेच्या विविध अधिकाऱ्यांची भेट घेत शिरीष बोराळकरांना पहिल्या पसंतीचे मतदान करण्यासाठी आवाहन केले. यावेळी त्यांच्या सोबत ॲड. माधुरी अदवंत, विमल तळेगावकर, मंगला वाहेगावकर, प्रतिभा जऱ्हाड यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

---- कॅप्शन : नितीन पाटील यांची सदिच्छा भेट घेताना सुषमा बोराळकर.

Web Title: Wife Sushma in the field for Shirish Boralkar's campaign