पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा
By Admin | Updated: August 18, 2016 00:58 IST2016-08-18T00:31:09+5:302016-08-18T00:58:32+5:30
विलास भोसले , पाटोदा अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचे बुधवारी उघडकीस आले.

पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा
विलास भोसले , पाटोदा
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचे बुधवारी उघडकीस आले. सौताडा येथे २० जून २०१६ रोजी आढळलेल्या प्रेताची ओळख पटविण्याबरोबरच पोलिसांनी त्याच्या अंगातील शर्टच्या ट्रेडमार्कवरून खुनाचा छडा लावला.
धोंडिबा नामदेव सुरावार (४२, रा. येवती, ता. मुखेड, जि. नांदेड) असे मयताचे नाव असून, त्याची पत्नी कलावती व तिचा प्रियकर बाजीराव साबळे (रा. घाटेवाडी, ता. जामखेड, जि. नगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुरावार हे १० वर्षांपासून पुण्यातील भोसरी भागात टेलर काम करीत होते. बाजीराव साबळे हा वाहनचालक म्हणून काम करतो. तो त्याच भागात राहत असल्याने कलावतीसोबत त्याची ओळख झाली. धोंडिबा सुरावार काही महिन्यांपूर्वी पाटोदा येथे स्थायिक झाले होते. १७ जून रोजी रात्री धोंडिबाला बाजीरावने दारू पाजली. दोरीने गळा आवळून प्रेत दुचाकीवरून सौताडा घाटात फेकले. उपअधीक्षक डॉ. अभिजीत पाटील, निरीक्षक अजिनाथ रायकर व कर्मचाऱ्यांनी गुन्हा उघडकीस आणला.
धोंडिबाला संपविल्यानंतर बाजीराव व प्रेयसी कलावती यांनी पाटोदा सोडले.
४ते दोघे जामखेड (जि. नगर) येथे भाड्याने खोली करून राहू लागले.
४धोंडिबा बेपत्ता असल्याचे सासरकडील लोकांना कलावतीने कळविले. परंतु याची तक्रार ना पाटोद्यात नोंदवली, ना पुण्यात.
४धोंडिबाची ओळख पटल्यानंतर तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तेव्हाच पोलिसांनी प्रकरण एवढे सरळ नाही, हे हेरले होते.