पत्नीचा खून करणाऱ्या नराधमास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2016 01:02 IST2016-12-24T01:00:03+5:302016-12-24T01:02:32+5:30
जालना : लग्नात सासरकडील मंडळींनी ड्रेसचे पैसे दिले नाहीत म्हणून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून करणाऱ्या पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

पत्नीचा खून करणाऱ्या नराधमास जन्मठेप
जालना : लग्नात सासरकडील मंडळींनी ड्रेसचे पैसे दिले नाहीत म्हणून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून करणाऱ्या पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जाकेर बेग रहेमान बेग असे आरोपीचे नाव आहे.
भोकरदन येथील शासकीय बांधकाम विभागाचा कर्मचारी असलेला जाकेर बेग याचा विवाह १२ जानेवारी २०१४ रोजी आतीयाबी यां
च्याशी झाला होता. लग्नात सासरच्या मंडळीने ड्रेसचे पैसे दिले नाहीत. माहेरवरून पैसे आणले नाहीत या कारणावरून आतियाबी यांच्याशी वारंवार वाद करून मारहाण करत होता. परंतु विवाहाला दोन महिने होत नाहीत तोच १२ मार्च रोजी शासकीय निवासस्थानी जाकेर बेग याने पत्नी आतियाबीला पाईपने मारहाण करून तिचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. भोकरदन पोलीस ठाण्यात पती जाकेर विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एकूण १२ साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले. साक्षीपुरावे आणि परिस्थितीजन्य पुराव्यावरून आणि वैद्यकीय अहवाल याचा आधार घेऊन अप्पर सत्र न्यायाधीश अनघा रोट्टे यांनी आरोपी जाकेर बेग याला जन्मठेपची शिक्षा तसेच १० हजार रूपये दंड ठोठावला. सरकारी पक्षातर्फे या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील दीपक कोल्हे यांनी काम पाहिले.