अनैतिक संबधातून पत्नीस पेटविले
By Admin | Updated: February 13, 2015 00:46 IST2015-02-13T00:30:38+5:302015-02-13T00:46:08+5:30
परतूर: अनैतिक संबध असल्याच्या कारणावरून पती व सासरच्यांनी पत्नीस पेटवून देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी परतूर पोलिसात सासरच्या तीन

अनैतिक संबधातून पत्नीस पेटविले
परतूर: अनैतिक संबध असल्याच्या कारणावरून पती व सासरच्यांनी पत्नीस पेटवून देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी परतूर पोलिसात सासरच्या तीन जणांसह अन्य एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंठा तालूक्यातील ब्रम्हनाथ तांडा येथील फिर्यादी ज्योती विजय राठोड रा. ब्रम्हनाथ तांडा हिस आरोपी पती विजय श्रीराम राठोड, सासरा श्रीराम हेमला राठोड, सासू बेबाबाई श्रीराम राठोड व अन्य महिला चतुराबाई अर्जुन चव्हाण यांनी संगनमत करून त्रास दिला. सन २०१० ते ११ फेब्रुवारी १५ दरम्यान ज्योती राठोड हिच्या पतीचे बाहेर अनैतिक संबध असल्याच्या कारणारून तीस शारीरिक, मानसिक छळ केला. तिला जिवंत मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी ज्योती राठोडच्या अंगावर रॉकेल ओतून पेटून दिले म्हणून परतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पोलिस कॉन्स्टेबल बोलकर करीत आहेत. पुढील तपास सुरू असल्याचे ठाण्यातील सूत्रांनी सांगितले. (वार्ताहर)
जालना शहरातील बैजपुरा भागात एका महिलेचा विनयभंग करून तिला मारहाण करण्यात आल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. एजाजखान, मोईनखान, इम्रानखान, जिलानीबी यांनी क्षुल्लक कारणावरून सदर महिलेशी वाद केला.
४एजाजखान याने महिलेचा विनयभंग केला तर चारही आरोपींनी संगनमताने महिलेस चापट-बुक्क्याने मारहाण केली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन चारही आरोपींविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.