विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:03 IST2021-07-22T04:03:57+5:302021-07-22T04:03:57+5:30

:आरोपी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल : आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज महानगर : एका ३५ वर्षीय विधवेस लग्नाचे आमिष दाखवून ...

A widow is oppressed by the lure of marriage | विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

:आरोपी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल

: आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

वाळूज महानगर : एका ३५ वर्षीय विधवेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वाळूज महानगर परिसरातील ३५ वर्षीय विधवा एका कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. याच कंपनीत काम करणाऱ्या श्रीकांत विक्रम इंगोले (रा. सावरगाव बंगला, ता.जि. हिंगोली) या तरुणासोबत तिची ओळख झाली. श्रीकांतने तिच्याकडे मेस लावली. मला आई- वडील व नातेवाईक कुणीच नसल्याचे सांगत तिचा विश्वास संपादन केला. या काळात श्रीकांतला हर्नियाचा आजार झाल्याने तिने त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करून त्याची काळजी घेतली. त्यानंतर श्रीकांत त्या महिलेच्या घरी राहण्यासाठी आला.

स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर तुझ्यासोबत लग्न करेन, असे आमिष दाखवून तिच्यासोबत श्रीकांतने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीला जायचे सांगून त्याने पीडितेकडून एलआयसी व निराधार योजनेचे मिळालेले ३ लाख रुपये नेले. तो अधूनमधून घरी येऊन मुक्कामी राहायचा. वर्षानंतर तो दिल्लीवरून परतला व आजारी पडल्याने तिने उपचाराचा खर्चही केला. त्यानंतर श्रीकांत शहरातील नारळीबागेत राहू लागला. तरी तो तिच्या घरी मुक्कामी जाई. पुढे तो पुण्याला निघून गेला. नोकरी लागल्यानंतर लग्न करतो, अशा थापा तो मारत असे. पुढे लग्नाचा तगादा लावल्याने तो तिला मारहाण करू लागला.

आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

श्रीकांतने नात्यातील एका दुसऱ्या मुलीसोबत लग्न जुळविल्याची माहिती पीडितेला मिळाली होती. तिने लग्नाच्या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे जाऊन श्रीकांतला जाब विचारला. तेव्हा त्याने ३ लाख रुपये परत देण्यासह मुलाच्या शिक्षणासाठी पैसे देण्याचे आश्वासन देऊन तिला परत पाठविले. श्रीकांत हा पैसे देत नसल्याने पीडितेने त्याच्याविरोधात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव हे तपास करीत आहेत.

---------------------

Web Title: A widow is oppressed by the lure of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.