विधवेवर साताऱ्यात सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: April 14, 2016 01:17 IST2016-04-14T00:36:19+5:302016-04-14T01:17:41+5:30

औरंगाबाद : न्यायालयीन प्रकरणात मदत करतो आणि एक फ्लॅट घेऊन देतो, असे आमिष दाखवून दोघांनी विधवेवर सामूहिक बलात्कार केला

Widow gang rape in Satara | विधवेवर साताऱ्यात सामूहिक बलात्कार

विधवेवर साताऱ्यात सामूहिक बलात्कार


औरंगाबाद : न्यायालयीन प्रकरणात मदत करतो आणि एक फ्लॅट घेऊन देतो, असे आमिष दाखवून दोघांनी विधवेवर सामूहिक बलात्कार केला. ही घटना २००७ पासून फेब्रुवारी २०१६ दरम्यान घडली. याप्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एका वकिलाचा समावेश आहे.
अ‍ॅड. प्रकाश सुरवसे (रा.जालाननगर) आणि भानुदास टाकसाळे (रा. श्रीरामपूर, अहमदनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सातारा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती फौजदार रवींद्र बागूल यांनी दिली.
पीडितेच्या पतीचे निधन झालेले आहे. त्यांच्या पेन्शन आणि प्रॉपर्टीसंबंधीचे प्रकरण न्यायालयात आहे. याच प्रकरणामुळे पीडिता व सुरवसे आणि टाकसाळे यांची ओळख झाली. न्यायालयीन प्रकरणात आम्ही तुम्हाला मदत करू तसेच फ्लॅट घेऊन देऊ, असे आमिष दाखवून आरोपींनी विधवा महिलेवर बलात्कार केला. या दोन्ही आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करून या प्रकरणाची कुणाला माहिती दिली तर तुझी बदनामी करू, अशी धमकी दिली. मंगळवारी (दि.१२) पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केल्यानंतर दोन्ही आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी सातारा पोलिसांनी आरोपी प्रकाश सुरवसे आणि भानुदास टाकसाळे यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही शनिवारपर्यंत (दि.१६) पोलीस कोठडी सुनावली आहे, असे पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले.

Web Title: Widow gang rape in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.