शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या रुंदीकरणाची साडेसाती संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 19:33 IST

एनएचएआयकडे रस्ता वर्ग होऊनही कामाला गती मिळेना

ठळक मुद्देडीपीआरचे काम रखडले नागरिकांच्या अडचणी सुटता सुटेनात

- विकास राऊत  

औरंगाबाद : औरंगाबाद ते पैठण मार्गे शेवगाव ते तीसगावपासून पुढे अहमदनगर या एनएच क्रमांक २२२ च्या रुंदीकरणात मनपाची जलवाहिनी, नागरी वसाहतींमुळे अडचण असल्यामुळे संपूर्ण प्रकल्प अहवाल (डीपीआर) चे काम ठप्प पडले आहे. बिडकीन परिसरात २० ते २५ कि़मी.च्या अंतरात अडथळ्यांवर मात करीत या मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी ३०० कोटींचा अतिरिक्त निधी लागण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्या मार्गासाठी डीपीआर तयार केला होता; परंतु नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे या मार्गाच्या कामाची जबाबदारी देण्यात आल्याने तो डीपीआर रद्द करून नव्याने डीपीआर करण्याचे ठरले. औरंगाबाद ते पैठण ६० कि़मी. पैठण ते शेवगाव ३० कि़मी. पुढे २० कि़मी. तीसगावपर्यंत व तेथून पुढे ३० कि़मी. अहमदनगरपर्यंत या मार्गाचे चौपदरीकरण प्रस्तावित आहे. १४० कि़मी. पर्यंत या मार्गासाठी १ हजार १०० कोटींच्या आसपास खर्च लागण्याची शक्यता आहे; परंतु आजवर काहीही वेगवान हालचाली होताना दिसत नाहीत. 

काही ठिकाणी जमिनीचे वाद आहेत. बिडकीनपर्यंत रुंदीकरणात अडचणी आहेत. बायपास करण्यासाठी कुठेही जागा नाही. काही मालमत्तांची तोडफोड करावी लागेल. मनपाची जलवाहिनीदेखील त्याच मार्गात आहे. जलवाहिनी काढून स्थलांतरित करण्याचा खर्च ३०० कोटींच्या आसपास जाईल, असे एनएचएआय सूत्रांनी सांगितले.

अजून निर्णय झालेला नाही२० ते २५  कि .मी.च्या अंतरात आर्थिकदृष्ट्या जो परवडेल तो पर्याय निवडून त्याची माहिती एनएचएआयच्या मुख्यालयाला कळवावी लागणार आहे. उड्डाणपूल, भूसंपादन करणे अथवा जलवाहिनी स्थलांतरणासाठी मनपाशी चर्चा करण्याचा निर्णय होईल. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासोबत मे आणि जुलै २०१८ मध्ये या रस्त्याबाबत बैठक झाली. सध्या डीपीआरचे काम ठप्प आहे. डीपीआरमध्ये जलवाहिनी व इतर अडचणी येत आहेत. भूसंपादन व इतर जलवाहिन्यांसह किती खर्च लागणार हे डीपीआरनंतर समोर येईल. 

भारतमालामध्ये समावेश होऊन काहीच नाहीकेंद्रीय दळणवळण खात्याच्या भारतमाला योजनेंतर्गत औरंगाबाद ते पैठण मार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश करण्यात आला आहे.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रास्ट्रक्चर कन्क्लेव्ह’ या कार्यक्रमात त्या मार्गाचे चौपदरीकरण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) करण्याचे काम सुरू झाले. भूसंपादन, मार्ग रुंदीकरणात येणारी जलवाहिनी, निवासी घरकुलांची माहिती पुढे आल्यानंतर डीपीआरचे काम बंद पडले आहे. दरम्यान, एनएचएआयचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी या प्रकल्पाच्या सद्य:स्थितीबाबत सांगितले, चौपदरीकरणाचा प्रस्ताव आहे. भारतमालामध्ये त्याचा समावेश आहे. अद्याप केंद्रीय दळणवळण खात्याकडून काहीही निर्देश आलेले नाहीत. 

जुलै २०१८ पासून पाठपुरावाच नाही लिंक रोड ते पैठणपर्यंतच्या चौपदरीकरणात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्यमान व भविष्यात होणाऱ्या जलवाहिनी योजनेची अडचण  येणार आहे. २० ते २५ कि़मी. परिसरात जलवाहिनी चौपदरीकरणासाठी अडसर ठरणार असून, त्याबाबत तातडीने तोडगा निघाला, तर त्या रस्त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे (डीपीआर) काम मार्गी लागेल आणि रस्त्याच्या कामासाठी पुढील प्रक्रिया करणे सोपे होईल, असे मत नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी जुलै २०१८ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बैठकीत व्यक्त केले होते. याप्रकरणी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मनपाला रस्त्याचे चौपदरीकरण गृहीत धरून जलवाहिनी योजनेचा संभाव्य आराखडा तयार करण्याचे पत्र एनएचएआयला देण्याचे आदेश दिले होते; परंतु अजून मनपाने कोणताही पत्रव्यवहार याबाबत केलेला नाही. 

टॅग्स :highwayमहामार्गAurangabadऔरंगाबादfundsनिधी