शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

खिळखिळ्या बसमध्ये वाय-फाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:20 IST

डबघाईला आलेल्या ‘लाल परी ’ च्या गळ्यात आता परिवहन मंडळाने वाय-फाय बसवले आहे. मात्र, खिळखिळ्या बसमध्ये बसविलेले वाय-फाय वापरणे प्रवाशांना गैरसोयीचे ठरत आहे.

शेषराव वायाळ ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : डबघाईला आलेल्या ‘लाल परी ’ च्या गळ्यात आता परिवहन मंडळाने वाय-फाय बसवले आहे. मात्र, खिळखिळ्या बसमध्ये बसविलेले वाय-फाय वापरणे प्रवाशांना गैरसोयीचे ठरत आहे.परतूर बस आगाराच्या गाड्यांची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. पत्रे उचकटले आहेत. गावांचे बोर्डही पुसट झाले आहेत. काही बसला दुस-या रंगाच्या पत्र्यांचे ठिगळ देण्यात आले आहेत. बसधमील आसनेही मोडली आहेत. चालक बसतात ते सीटसुध्दा जुगाड करून कसेबसे ठीक केलेले पाहावयास मिळत आहे. एका बसमधील चालकाचे सीट खराब झाल्याने त्याखाली दगड ठोकण्यात आला आहे. बसच्या पत्र्यांचे स्क्रूही निखळलेले आहेत. बसचे अनेक पार्ट निकामी झाले आहेत. या आगारात बसची संख्या ४९ आहे. बस, चालक व वाहकाची संख्याही अपुरी आहे. आगारात अनेक महत्त्वाच्या समस्या असताना बसमध्ये वाय-फायची यंत्रे बसविण्यात आली आहेत. बस बरोबरच रस्त्याचीही झालेली दुरवस्था यामुळे बसमधील प्रवाशांना आलेला मोबाईल उचलून बोलणे अवघड आहे. मोबाईलचा आवाजच धड येत नाही, तर या बसेसमध्ये वाय-फायची सुविधा कशी वापरणार हा प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत. सुधारीत तंत्रज्ञानचा अवलंंब करणे ही काळाची गरज आहे. मात्र, त्या अगोदर अत्यावश्यक सुविधाही द्यायला हव्यात, असे काही प्रवाशांनी सांगितले. बसचे छतच पावसाळ्यात गळत असेल तर इंटरनेट सुविधा देणे कितपत योग्य आहे? त्यामुळे प्रवाशांना पुरवण्यात आलेल्या सेवेचा काय फायदा, हा संशोधनाचा विषय आहे.