शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरातील शिवाजीनगर येथे साडेचार मीटर उंचीचा भुयारी मार्ग का केला नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 16:46 IST

शिवाजीनगर भुयारी मार्ग वादाच्या भोवऱ्यात, मोठ्या वाहनांना चार किमीचा फेरा

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर येथील भुयारी मार्ग वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, या ठिकाणी किमान साडेचार मीटर उंचीचा भुयारी मार्ग पाहिजे होता. रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने मिळून अवघ्या साडेतीन मीटरचा मार्ग तयार केला. त्यामुळे यातून मोठी वाहने ये-जा करू शकत नाहीत. मोठ्या वाहनांना किमान चार किमीचा फेरा घ्यावा लागत आहे. चुकीने या ठिकाणी मोठी वाहने आल्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

सातारा-देवळाई भागात नागरी वसाहतींची संख्या झपाट्याने वाढत आहे. या भागात सध्या किमान ३५ ते ४० हजारांपर्यंत लोकसंख्या पोहोचली आहे. नागरिकांना महापालिकेचे पाणी मिळू लागल्यास या भागात प्लॉट शिल्लक राहणार नाहीत. भविष्याचा विचार करता शिवाजीनगर येथे रेल्वे उड्डाणपूलच हवा होता. शासकीय यंत्रणांनी असे न करता मनमर्जीप्रमाणे रेल्वे अंडरपास तयार केला. अत्यंत छोट्या पद्धतीचा हा अंडरपास असून, त्यातही पावसाच्या पाण्याचा निचरा होणारी यंत्रणा नाही. त्यामुळे शहरवासीयांनी टीकेची झोड उठविली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दोषी अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई प्रस्तावित केलेली नाही. भुयारी मार्गाच्या भोंगळ कामामुळे महापालिकेतील निवृत्त शहर अभियंत्यांनी दोषींना मूर्खात काढले. पावसाळ्यात पुन्हा भुयारी मार्गात पाणी, चिखल साचणार हे निश्चित.

भुयारी मार्गाची उंची किती असावी?पादचाऱ्यांसाठी साधारणतः २.२ मीटर (७.२ फूट).लघू वाहने (दुचाकी, चारचाकी) : २.५ ते ३.५ मीटर. (११ फूट)जड वाहने (बस, ट्रक) यासाठी : ४.५ मीटरपेक्षा जास्त हवी. (१४ फूट)

कोणती वाहने ये-जा करू शकतात?साडेचार मीटर उंचीचा भुयारी मार्ग असेल तर मोठी वाहनेही सहजपणे ये-जा करू शकतात. शिवाजीनगर येथील भुयारी मार्गाची उंची फक्त ११ फूट असल्याने बस इ. वाहने येऊ शकत नाही. माहीत नसलेले मोठे वाहनधारक दररोज येथे येऊन फसत आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका