शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

तुमच्या उमेदवारासाठी आम्ही का पळावे? महायुती-आघाडीत घटक पक्षांची प्रचारात सक्रियता नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 18:41 IST

ज्या पक्षाचा उमेदवार, त्याच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय असल्याचे दिसते.

बीड : जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीला जास्त जागा आहेत. भाजपला दोन आणि ठाकरे गटाला एकमेव जागा आहे. त्यामुळे युती आणि आघाडीतील मित्र आणि घटक पक्ष अजूनतरी पूर्ण ताकदीने प्रचारात उतरलेले नाहीत. ज्या पक्षाचा उमेदवार, त्याच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय असल्याचे दिसते. मैत्री असली तरी तुमच्या उमेदवारासाठी आम्ही का पळावे? असा सवाल इतर पक्षाचे पदाधिकारी करत आहेत.

जिल्ह्यात परळी, बीड, आष्टी, केज, गेवराई आणि माजलगाव असे सहा मतदारसंघ आहेत. महायुतीत आष्टी आणि केज मतदारसंघात भाजपला तर इतर पाच ठिकाणी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. आघाडीत केवळ गेवराईला अजित पवार गटाची जागा असून पाच ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. सध्या तरी जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादीचेच उमेदवार जास्त असल्याचे दिसत आहे. परंतु युतीतील अजित पवार गटासोबत असलेली शिंदेसेना आणि भाजप हे बीड, गेवराई, माजलगाव, परळी मतदारसंघात फारशी सक्रिय असल्याचे दिसत नाही. तर भाजपचे उमेदवार असलेल्या ठिकाणी इतर पक्ष सक्रिय नाहीत. आघाडीतही अशीच अवस्था आहे. गेवराईत ठाकरे गटाचा उमेदवार असल्याने शरद पवार गट आणि काँग्रेसचे पदाधिकारी सक्रीय झालेले नाहीत. यावरून युती, आघाडी असली तरी इतर पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अद्यापही मानपान दिला जात नसल्याने हे लोक प्रचारापासून दूरच असल्याचे दिसत आहे. युती आणि आघाडीतील काही मोजके पदाधिकारी मात्र पहिल्या दिवसापासून सक्रिय आहेत.

भाजप, काँग्रेसमध्ये नवे जिल्हाध्यक्षविधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच भाजपचे राजेंद्र मस्के यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत पक्षालाही सोडचिठ्ठी दिली. आता त्यांच्या जागी शंकर देशमुख यांची नियुक्ती केली आहे. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना परळी मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी राहुल सोनवणे यांची नियुक्ती केली आहे. मस्के आणि देशमुख या दोघांनीही शरद पवार गटात प्रवेश केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकbeed-acबीडmajalgaon-acमाजलगांवashti-acआष्टीgeorai-acगेवराईkaij-acकेजparli-acपरळी