शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

खुलताबादचं नाव बदलून पुन्हा रत्नपूर का करायचं? संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 16:46 IST

खुलताबादचे नाव यापूर्वीही रत्नपूरच होते, असे रेकॉर्डवरही आहे, असा दावाही शिरसाट यांनी यावेळी केला...

खुलताबादचे नाव पुन्हा रत्नपूर करावे, अशी मागणी शिवसेना नेते तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. मुळात हे नामांतर नाही, तर झालेली चूर दुरुस्त करण्याचे काम आम्ही करत आहोत. खुलताबादचे नाव यापूर्वीही रत्नपूरच होते, असे रेकॉर्डवरही आहे, असा दावाही शिरसाट यांनी यावेळी केला.

यासंदर्भात बोलताना शिरसाट म्हणाले, "खुलताबादचे नाव पूर्वी रत्नपूर होते. हे रेकॉर्डवर आहे. इंग्रजांनी येथे जी सत्ता उपभोगली, ते जे शेतसारा वसूल करायचे त्यातही रत्नपूर असेच लिहिलेले आहे. म्हणून आम्ही काही नवीन मागतोय अशातला भाग नाही." तसेच, "दौलताबाद हे दौलताबाद नाही तर देवगिरी आहे. त्याला देवगिरी प्रांत म्हटलं जात होतं आणि राजा रामदेवरायांचे तेथे राज्य होते. आता दौलताबाद किल्ला काही औरंगजेबाने बांधला आहे का? नाही. ती असलेली वास्तू, तेथे राज्य केले आहे. शिरसाट एबीपी माझासोबत बोलत होते. 

...मग आपण आपला स्वाभिमान जागृत करायला नको? -शिरसाट पुढे म्हणाले, "आपण हे जे नामांतर म्हणतो ना, तर हे नामांतर नाहीय, तर झालेली चूर दुरुस्त करण्याचे काम आम्ही करत आहोत. त्याचे कारण एक आहे, आम्ही जी औरंगजेबाची कबर खोदण्याचा विषय काढला, त्याचा काही लोकांना त्रास झाला. मग त्यांना स्वाभिमान आहे, मग आपण आपला स्वाभिमान जागृत करायला नको?

जसे संभाजीनगर झाले, तसेच... -"यासंदर्भात मी मुख्यमंत्रीसाहेबांना पत्र देतोय आणि टेक्निकल प्रोसेस जी आहे की, याला विधानसभेत, हाऊसमध्ये मान्यता घ्यावी लागेल. यानंतर ते केंद्राकडे पाठवावे लागेल. केंद्राच्या मान्यतेनुसारच हे नाव बदलले जाईल. जसे, धाराशीव झाले, अहमदनगरचे अहिल्यानगर झाले. संभाजीनगर झाले. त्याच पद्दतीने हेही आपल्याला केंद्राच्या गॅझेटमध्ये आणावे लागेल. यानंतरच तेही बदलले जाईल.

 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटShiv SenaशिवसेनाKhulatabadखुल्ताबाद