शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

न्यायदानात हस्तक्षेपाबाबत कारवाई का करू नये ? बीडचे शिक्षणाधिकारी शिंदेंना खंडपीठाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 12:54 IST

सुनावणीस हजर असताना खुलासा विचारला असता ‘योग्य तो आदेश करा’ असे उद्धटपणे उत्तर बीडचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नागनाथ मालाजी शिंदे यांनी दिले. याची गंभीर दखल खंडपीठाने घेतली.

छत्रपती संभाजीनगर : संस्थेने नियुक्तीच न दिलेल्या महिलेला रुजू करून घेण्याचा आग्रह धरणारे बीडचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नागनाथ मालाजी शिंदे यांना ‘न्यायदानात हस्तक्षेपाबाबत कारवाई का करू नये?’ अशी नोटीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. एम. जोशी यांच्या आदेशाने बजावण्यात आली.

या महिलेला रुजू करून घेण्याच्या शाळा न्यायाधीकरणाच्या आदेशास आव्हान देणारी याचिका खंडपीठात प्रलंबित आहे. ‘त्या’ आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापकांचा पगार रोखून सर्व कर्मचाऱ्यांचा पगार बंद करण्याचा प्रस्ताव शिंदे यांनी उपसंचालकांकडे पाठविल्याची गंभीर दखल खंडपीठाने घेतली. शिंदे यांनी बेकायदेशीरपणे अधिकाराचा गैरवापर करून संस्थेला बजावलेल्या दोन्ही नोटिसांना खंडपीठाने स्थगिती दिली.

काय आहे याचिका ?बीड येथील श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाने ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत म्हटल्यानुसार मीरा पांडुरंग गिलबिले यांनी याचिकाकर्त्यांच्या शाळेत कामही केलेले नसताना बनावट मान्यतेआधारे संस्थेने त्यांना सेवेतून कमी केल्याबाबत लातूर येथील शाळा न्यायाधीकरणात अपील दाखल केले होते. ते शाळा न्यायाधिकरणाने मंजूर केले. त्याविरुद्ध संस्थेने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली, ती सध्या प्रलंबित आहे. संस्थेने खंडपीठात दिवाणी अर्ज दाखल करून वरील बाबी निदर्शनास आणून दिल्या. वस्तुत: गिलबिले यांना संस्थेने कधीही नियुक्तीपत्र दिले नाही, त्यांनी शिक्षिका म्हणून कधीही शाळेत काम केले नाही किंवा हजेरीपटावर स्वाक्षऱ्याही केल्या नाहीत. शाळा न्यायाधीकरणाच्या आदेशास संस्थेने खंडपीठात आव्हान दिले असून, ती याचिका प्रलंबित आहे, असे ॲड. ठोंबरे यांनी निदर्शनास आणून दिले.

धक्कादायक वर्तनसुनावणीस हजर असताना खुलासा विचारला असता ‘योग्य तो आदेश करा’ असे उद्धटपणे शिंदे यांनी उत्तर दिले. याची गंभीर दखल खंडपीठाने घेतली. शिंदे यांचे वर्तन धक्कादायक असल्याचा उल्लेख करून, ते स्वत:ला ‘अपील- प्राधिकारी’ (ॲपेलेट अथॉरिटी) आणि शाळा न्यायाधीकरणाच्या आदेशाचे ‘अंमलबजावणी-प्राधिकारी’ (एक्फीक्युटिंग अथॉरिटी) समजतात. शाळा न्यायाधीकरणाच्या आदेशास आव्हान देणारी याचिका प्रलंबित असल्याचे त्यांना माहीत आहे. ही अधिक गंभीर बाब असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठBeedबीड