शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आव्हाने विराट असताना प्रतिसाद का नाही? : अभय बंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 18:49 IST

केळकर समितीचा अहवाल लागू करा 

ठळक मुद्देसहा वर्षांपासून हा अहवाल थंडबस्त्यात आहे.

औरंगाबाद : आज संपूर्ण जगासमोर ग्लोबल वॉर्मिंगपासून ते जातीयता, सांप्रदायिकता यासारखी विराट आव्हाने आ वासून उभी असताना त्याला प्रतिसाद का मिळत नाही, प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अनेक सभ्यता लोप पावत आहेत, महात्मा नाही तर नायक, वैश्विकदृष्टी असलेले  नवे नेतृत्व का उभे राहत नाही, राजकीय आंदोलने का उभी राहत नाहीत, असे अनेक मूलभूत प्रश्न आज येथे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी उपस्थित केले.

ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात न्या. नरेंद्र चपळगावकरलिखित ‘अनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्व’ या ग्रंथ प्रकाशनाप्रसंगी बोलत होते. अनंत भालेराव यांच्यावरील या ग्रंथातून प्रतिसादाची आणि नवे नायक निर्माण होण्याची प्रेरणा मिळो, अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली.लेखकीय मनोगत व्यक्त करताना न्या. चळगावकर हे भावुक झाले. अनंतरावांच्या अनेक आठवणींमध्ये ते रममाण झाले. प्रारंभी, अभंग प्रकाशनचे संजीव कुलकर्णी यांनी प्रास्ताविक  केले. विश्वाधार देशमुख यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सविता पानट यांनी आभार मानले. निशिकांत भालेराव, श्याम देशपांडे, नीमा कुलकर्णी आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. शंभर कोरे कागद व पेन, असे या स्वागताचे स्वरूप होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पं. विद्यासागर, विजय कुवळेकर, सुरेश द्वादशीवार व दिलीप माजगावकर यांनी शुभेच्छा संदेश पाठवले होते. यावेळी निळू दामले, गोपाळ साक्रीकर, राधाकृष्ण मुळी, भास्कर ढवळे, गोविंद जोशी यांचा सत्कार करण्यात आला. चपळगावकर पती-पत्नीचा विशेष सत्कार डॉ. बंग यांच्या हस्ते करण्यात आला. अनंत भालेराव यांच्या चाहत्यांची या कार्यक्रमास मोठी गर्दी उसळली होती.

केळकर समितीचा अहवाल लागू करा स्वप्नांचा अभाव हे एक मोठे आव्हान हल्ली निर्माण झालेय. मराठवाडा तर कायम पाणीटंचाई, कायम दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यामुळे ग्रासला गेलेला आहे. केळकर समितीने मराठवाड्यासाठी सव्वादोन कोटी लाख रुपयांच्या तरतुदींची शिफारस केलेली आहे.या समितीचा एक सदस्य म्हणून मी काम केलेले आहे.सहा वर्षांपासून हा अहवाल थंडबस्त्यात आहे. त्यावर ना मराठवाड्यातून आवाज उठतो, ना विदर्भातून? हा अहवाल नाकारला, तर काय गमावू याचा कुणी विचार केलाय का? या अहवालातून मराठवाडा व विदर्भ ही उपराज्ये सुचवलेली आहेत; पण त्याबद्दल कुणी काहीच बोलत नाही, याबद्दलची खंत बंग यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Abhay Bangअभय बंगSocialसामाजिकAurangabadऔरंगाबाद