शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बस का भावा! कारच नाही, टायरसाठीही घे कर्ज! एकदम पैसे देण्याचे टाळण्यासाठी चालकांचीही पसंती

By संतोष हिरेमठ | Updated: January 31, 2024 09:22 IST

आजकाल अनेक कर्ज सुविधा उपलब्ध आहेत. कर्ज घेतले की दुचाकी, चारचाकी वाहन दारात येते.  वाहन घेण्यासाठीच नव्हेतर, आता फक्त टायर घेण्यासाठीही कर्ज दिले जाते आहे.   

- संतोष हिरेमठ छत्रपती संभाजीनगर : आजकाल अनेक कर्ज सुविधा उपलब्ध आहेत. कर्ज घेतले की दुचाकी, चारचाकी वाहन दारात येते.  वाहन घेण्यासाठीच नव्हेतर, आता फक्त टायर घेण्यासाठीही कर्ज दिले जाते आहे.   

पूर्वी कर्ज घ्यायचे म्हटले की, अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असे. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही कर्ज मिळेलच, याची शाश्वती नसे. मात्र, गेल्या काही वर्षांत कर्ज घेणे अगदी सोपे झाले आहे. घर, वाहन अगदी मोबाइल घेण्यासाठीही कर्जाची सुविधा अनेक कंपन्यांकडून दिली जात आहे. त्यातच आता वाहनासाठी नवे टायर घ्यायचे असतील तरीही कर्जाची सुविधा अनेक मोठ्या कंपन्यांनी उपलब्ध करून दिली आहे. अनेक टायर विक्रेत्यांकडे मोठमोठ्या फलकांवर ‘लोन पे टायर..’ लिहिलेले पाहायला मिळत आहे. 

किती आहेत किमती ?- दुचाकी - १,५०० ते २,००० रुपये- तीन, चारचाकी - २,५०० ते ३,००० रुपये- चारचाकी - ३,००० ते १०,००० रुपये 

अनेक जण कर्जावर टायर घेतात. चार ते पाच महिन्यांत हप्ते संपतात. महिन्याला  १० जण तरी कर्जावर टायर घेतात.- अमरदीप सिंंग, व्यावसायिक 

सुलभ परतफेड कर्जावर टायर खरेदी केल्यानंतर ग्राहकाला सुलभ हप्त्यांत परतफेड करण्याची सोय आहे. त्यामुळे एकाच वेळी पैसे देण्याची वेळ टळते. 

कधी बदलावेत?- सरासरी ३०  हजार ते ५० हजार कि.मी.नंतर वाहनाचे टायर बदलावेत. - टायरमध्ये दिलेल्या इंडिकेटरद्वारे अचूक वेळदेखील शोधता येते.- जेव्हा रस्त्याच्या संपर्कात असलेला भाग संपतो  तेव्हा टायर बदलण्याची वेळ आल्याचे समजावे.- टायर जीर्ण झाला असेल तर अशा परिस्थितीत टायर बदलावेत.  - टायरमध्ये अर्धा सेंटिमीटरपेक्षा जास्त छिद्र असेल तर टायर बदलावेत. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद