शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

छत्रपती संभाजीनगरचे 'लबाडांनो पाणी द्या' आंदोलन भाजपला का लागलं? अंबादास दानवेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 18:32 IST

छत्रपती संभाजीनगरातील पाणी प्रश्नांवर आम्ही महिनाभर आंदोलन केले. आमचे आंदोलन घराघरापर्यंत पोहचले आहे: अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर: आमच्या आंदोलनाविरोधात पत्रकार परिषद घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लबाडांनो पाणी द्या असे आम्ही म्हणालोच नाही,  मात्र हे जर त्यांना लागलंं असेल तर आमच्या आंदोलनाच यश आहे, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ.अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका केली. लबाडांनो पाणी द्या हे आंदोलन  शहराच्या पाणी वाटप नियोजन कोलमडण्याविरोधात असल्याचे दानवे यांनी पत्रकार परिषदेत  स्पष्ट केले.

आ.दानवे म्हणाले की,शहर पाणी प्रश्नांवर आम्ही महिनाभर आंदोलन केले. आमचे आंदोलन घराघरापर्यंत पोहचले आहे, यामुळे ते केवळ एका पक्षाचे नव्हे तर जनतेचे आंदोलन झाले आहे. शहराला २४० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात रोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होतो. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन केले तर शहरवासियांना एक,दोन दिवसाआड पाणी मिळू शकते, मात्र मनपा प्रशासक आयपीएल पाहण्यात दंग आहे. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. आम्हाला लबाड म्हणारी पत्रके वाटप करणाऱ्या भाजपही मागील २५ ते ३० वर्ष आमच्यासोबत मनपात सत्तेत होते. विजया राहाटकर, डॉ. भागवत कराड हे महापौर होते. प्रत्येक टर्मला अनेकदा उपमहापौरही त्यांचा असायचा. एवढेच नव्हे तर स्थायी समिती सभापतीही त्यांचे होते. अतुल सावे हे जलसम्राट आहेत, तर मग भाजपला नैतिकदृष्ट्या आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नसल्याचे दानवे म्हणाले.

१६८० कोटींची योजना २७४० कोटींची कशी झालीनवीन पाणी पुरवठा योजना १६८० कोटी रुपयांची होती. नंतर ती २७४०कोटी रुपयांची कशी झाली, असा सवाल आ. दानवे यांनी उपस्थित केला.  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा  नंतर ही काम अत्यंत संथगतीने चालू आहे. या योजनेचे काम ३ फेब्रुवारी २०२४ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र सत्ताधाऱ्याचा वचक नसल्याने योजनेचे काम दोन वर्ष पूर्ण होऊ शकत नसल्याचे आ.दानवे यांनी नमूद केले.

शुक्रवारी आदित्य ठाकरे यांचा मोर्चाशहर पाणी प्रश्नांवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा पैठणगेट मार्गे गुलमंडीवर जाईल.तेथे आयोजित सभेतून समारोप होईल. रिकामे हंडे घेऊन महिला सहभागी होतील, असे आ.दानवे यांनी सांगितले.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरwater shortageपाणीकपात