अनिल कपूर व अनुराग कश्यप ट्विटरवर का भांडले ?

By | Updated: December 8, 2020 04:00 IST2020-12-08T04:00:08+5:302020-12-08T04:00:08+5:30

अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांच्यात चांगलेच ट्विटर वॉर रंगले. दोघांनीही एकमेकांची उणीदुणी काढण्यात कोणतीही कसर सोडली नाही. अनुरागने ...

Why did Anil Kapoor and Anurag Kashyap quarrel on Twitter? | अनिल कपूर व अनुराग कश्यप ट्विटरवर का भांडले ?

अनिल कपूर व अनुराग कश्यप ट्विटरवर का भांडले ?

अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांच्यात चांगलेच ट्विटर वॉर रंगले. दोघांनीही एकमेकांची उणीदुणी काढण्यात कोणतीही कसर सोडली नाही. अनुरागने अनिल कपूरच्या करिअरला ‘खटारा’ म्हटले. अनिल कपूर यांनीही ‘माझी गाडी ४० वर्षे तरी चालली. तुझी तर अद्यापही गॅरेजमध्येच उभी आहे,’ असे म्हणून अनुरागला डिवचले. अनिल विरुद्ध अनुरागचे हे ट्विटर वॉर पाहून चाहतेही दंग झालेत. हे दोघे इतके का भांडताहेत, हेच लोकांना कळेनासे झाले; पण आता चिंतेचे कारण नाही. होय, या भांडणाचे कारण आता स्पष्ट झालेय. मुळात हे भांडण नव्हतेच तर एक प्रमोशन स्टंट होता, हेही स्पष्ट झालेय.

''आरआरआर''च्या शूटिंगसाठी आलिया भट हैदराबादेत ''बाहुबली'' दिग्दर्शक एस. एस. राजामौलीचा ''आरआरआर'' हा पुढचा ब्लाॅकबस्टर सिनेमा आहे. प्रेक्षक या सिनेमाच्या रिलीजची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात ज्युनियर एनटीआर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट आणि ऑलिव्हिया मॉरिस यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाच्या शूटिंगसाठी आलिया भट्ट मुंबईहून हैदराबादला रवाना झाली आहे. रविवारी ती मुंबईतल्या प्रायव्हेट एअरपोर्टवर दिसली. आलियाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. अजय देवगण या दोघांच्या गुरूची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Web Title: Why did Anil Kapoor and Anurag Kashyap quarrel on Twitter?