शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

सातारा-देवळाई येथील कर्मचारी कोणाच्या आदेशाने मनपात घेतले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 7:03 PM

सातारा-देवळाई नगरपरिषदेचा भाग महापालिकेत २०१६ मध्ये समाविष्ट करण्यात आला.

ठळक मुद्देआस्थापना विभागाला दिले पत्रलेखा परीक्षणात आक्षेप 

औरंगाबाद : सातारा-देवळाई ग्रामपंचायतीचे ४२ कर्मचाऱ्यांचे महापालिकेत समायोजन करून घेतले. आर्थिक देवाण-घेवाण करण्याच्या हेतूने हे झाले असावे, अशी शंका महापालिकेच्या लेखा परीक्षण विभागाने व्यक्त केली आहे. मुख्य लेखापरीक्षक डॉ. दे. का. हिवाळे यांनी महसूल उपायुक्त व आस्थापना अधिकाऱ्यांना पत्र देऊन ७ मुद्यांवर माहिती मागविली आहे.  त्यामुळे सातारा-देवळाई येथील कर्मचारी भरतीचा वाद ४ वर्षांनंतर पुन्हा उफाळून आला आहे. 

सातारा-देवळाई नगरपरिषदेचा भाग महापालिकेत २०१६ मध्ये समाविष्ट करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या काळातील ४२ कर्मचाऱ्यांचे महापालिकेत समायोजन करण्यात आले. यासंदर्भात प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी येताच नगरसेवकांनी समायोजन करण्यापूर्वी शासनाची परवानगी घेतली आहे का? महापालिकेच्या कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे या कर्मचाऱ्यांना वेतन कसे देता येईल? यासह अनेक प्रश्‍न उपस्थित केले. पण प्रस्ताव मंजूर करण्यात आला व या कर्मचाऱ्यांना वेतनही सुरू झाले. या प्रकरणाची चौकशी झाली व या नियुक्त्या बेकायदा असल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला. महापालिकेने दिलेले जास्तीचे वेतन वसूल करण्याचे आदेश झाले. या विरोधात कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मुख्य लेखापरीक्षक डॉ. हिवाळे यांनी पत्र देत माहिती मागवली आहे. हिवाळे यांनी टाकलेल्या बॉम्ब गोळ्यामुळे पुन्हा एकदा प्रशासन बॅकफूटवर आले आहे. 

असे आहेत पत्रातील मुद्दे सद्यःस्थिती कर्मचाऱ्यांना ठराविक वेतन दिले जाते किंवा वेतनश्रेणीनुसार वेतन दिले जाते, वेतनावर आतापर्यंत किती खर्च झाला, भविष्यात किती खर्च होईल, याचा तपशील लेखा विभागाने व आस्थापना विभागाने सादर करावा. रोजंदारी कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत समावून घेता येते किंवा नाही, याबाबतचा तपशील नसताना नियमित कर्मचारी असा शब्दप्रयोग प्रशासनाने कशामुळे केला याविषयी साशंकता असून, खुलासा करण्यात यावा.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद