शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार? महाविकास आघाडीत चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 12:00 IST

सिल्लोड, वैजापूर, कन्नड आणि पैठण तालुक्यांतील सदस्यांमध्ये चुरस

ठळक मुद्देइच्छुकांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात काँग्रेसलाही अध्यक्षपदाची अपेक्षा

- राम शिनगारे  

औरंगाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडणुकीला १५ दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळे इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. राज्यात सत्तास्थानी आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील पक्षच जि. प. मध्ये सत्तेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा अध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर यांचा कार्यकाळ २१ सप्टेंबर रोजी संपणार होता. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे राज्य शासनाने विद्यमान पदाधिकाऱ्यांना तीन महिन्यांचा कार्यकाळ वाढवून दिला होता. हा वाढविलेला कार्यकाळ २१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वीच जि.प. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेत एकूण ६२ सदस्य आहेत. त्यापैकी प्रा. रमेश बोरनारे हे विधानसभा निवडणूक जिंकल्यामुळे त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे जि.प.मध्ये ६१ सदस्य असणार आहेत. यात शिवसेना १८, काँग्रेस १६, भाजप २३, राष्ट्रवादी काँग्रेस २, मनसे व रिपाइं (डेमोक्रॅटिक) पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. महाविकास आघाडीचे संख्याबळ हे ३६ पर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे भाजपची सत्ता येण्याची शक्यता मावळली आहे. 

जि.प.चे अध्यक्षपद सर्वसाधारण गटातील महिलांसाठी राखीव असल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विद्यमान अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर या पुन्हा अध्यक्षपद मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचे पती कृष्णा पाटील डोणगावकर हे पुन्हा अध्यक्षपद मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षांतराच्या चर्चा त्यांना अडचणीच्या ठरणार आहेत. याशिवाय  सदस्या स्वाती निरफळ, शुभांगी काजे, मोनाली राठोड, पार्वताताई जाधव, वैशाली पाटील, सविता चव्हाण यांचीही नावे चर्चेत आली आहेत.

राज्य शासनामध्ये पैठण तालुक्याला मंत्रीपद मिळाल्यास अध्यक्ष हा सिल्लोड तालुक्यातील आणि सिल्लोड तालुक्याला मंत्रीपद मिळाल्यास पैठण तालुक्यातील जि.प. अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. याशिवाय माजी खा. चंद्रकांत खैरे यांचे समर्थक मानले जाणारे केतन काजे यांच्या पत्नी शुभांगी काजे यांचेही पारडे तुल्यबळ असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे शुभांगी काजे यांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नीचा पराभव केला होता, तेव्हापासून खैरे आणि जाधव यांच्यात वितुष्ट आले होते. त्यानंतर घडलेल्या राजकारणात केतन काजे यांनी खैरे यांना सक्षमपणे साथ दिलेली आहे.

काँग्रेसलाही अध्यक्षपदाची अपेक्षाजि.प.मध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेला काँग्रेस पक्षाने साथ दिली होती. शिवसेनेचे १८ सदस्य निवडून आलेले आहेत. काँग्रेसचे १६ सदस्य निवडून आलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसही उर्वरित सव्वा दोन वर्षांच्या अध्यक्षपदावर दावा करण्याची शक्यता आहे. यासाठी विद्यमान सभापती मीनाताई शेळके यांचे नाव आघाडीवर आहे. मीनाताई शेळके यांचे पती काँग्रेसचे फुलंब्री तालुकाध्यक्ष असून, कल्याण काळे यांचे समर्थक आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आलेली असल्यामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शिवसेना अध्यक्षपद सोडण्याची शक्यता कमीच आहे. भाजपकडून अध्यक्षपदासाठी अद्यापही मोर्चेबांधणीला सुरुवात झालेली नसल्याचे समजते. मात्र, भाजपकडून अनुराधा चव्हाण यांचे नाव आघाडीवर राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस