शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

यांना कोणी आवरा हो ! सोलापूर- धुळे हायवेवर बसथांब्याचे छत, केबलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 18:40 IST

शासकीय मालमत्तेची नासाडीमुळे वैतागलेले अधिकारी आता पोलिसात दाद मागणार

औरंगाबाद : अज्ञात माथेफिरुंनी सोलापूर-धुळे हायवेवरील सुविधांच्या नासाडीचा सपाटा लावला आहे. या महामार्गावरील बसस्थांब्याचे छत, पथदिव्यांची भूमिगत केबल चोरीने अधिकारी वैतागले आहेत. या चोरट्यांना कुणी आवरा हो.. ! असे म्हणण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली असून ते अखेर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार देण्याच्या तयारीत आहेत.

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर ते गांधेली-सातारा दरम्यान स्मार्ट सिटीसारखरे बसथांब्यांचे शेड उभारण्यात आले आहेत. चोरट्यांनी त्या शेडचे छतच काढून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. या महामार्गाच्या कडेला पावसाच्या सांडपाणी वाहून जाण्यासाठी साईड ड्रेनेज तयार केले असून त्यामध्ये दोन किलोमीटरपर्यंची टाकलेली केबल चोरट्यांनी जेसीबीच्या सहाय्याने ओढून ती चोरून नेल्याचे निदर्शनात आले आहे.

विकासाला गालबोट लावणारा प्रकार!दुभाजकांवर उगवलेल्या गवतावर जनावरे चरण्यासाठी सोडली जात असून त्याठिकाणी महामार्गाच्या सौंदर्यीकरणासाठी लावण्यात आलेली फुलझाडांची नासाडीही जनावरांकडून होत आहे. या महामार्गामुळे परिसराचे वैभव वाढले असून, कानाकोपऱ्यांत असलेली गाव रस्त्यांलगत आल्याने विकास होणार आहे. मात्र, महामार्गावरील सुविधांच्या चोऱ्यांचे प्रकार वाढत चालल्यामुळे अभियंते व लगतच्या गावांतील नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे.

गांधेली व बाळापूर-सातारा दरम्यान नुकसानगांधेली बाळापूर, सातारा-देवळाई परिसरातील रस्त्यावर हा प्रकार वाढल्याने नागरिकांनी आपल्या परिसरातील वैभव जपण्यासाठी प्रयत्न करावेत. मराठवाड्याच्या दृष्टीने हा रस्ता भूषणावह बाब असताना हे प्रकार थांबले जावेत. नाईलाजास्तव पोलीस ठाण्यात रितसर तक्रार देण्याच्या मनस्थितीत आहोत.-अधिकारी भारत सिंग (राष्ट्रीय महामार्ग)

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गtheftचोरी