शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
2
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
3
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
4
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
5
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
6
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
7
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
8
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
9
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
10
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
11
भाजपचा दिग्गजांना दे धक्का, भाजपकडून ४० टक्के नवे चेहरे! तिकीट न मिळाल्याने अनेकांची नाराजी
12
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
13
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
14
Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
15
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
16
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
17
शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
18
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
19
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
20
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

आमचे जन्मदाते कोण? दत्तक गेलेली मुले जेव्हा देश-विदेशातूनही आई-वडिलांचा पत्ता शोधत येतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 19:03 IST

भारतीय समाजसेवा केंद्राने अनेक मुलांची घडविली कुटुंबाशी भेट

- प्राची पाटील

छत्रपती संभाजीनगर : २००८ मध्ये विदेशातील २३ वर्षीय मुलीने तिच्या आई-वडिलांची चौकशी केली. मराठवाड्यातील जिल्ह्यातून आई-वडिलांनी मुलीला संस्थेत सोडले होते. चौकशी केल्यावर समजले की आई-वडील जगात नाहीत. मात्र, त्या मुलीचे बहीण-भावंड होते. बहिणीने भेटायची तयारी दर्शवली आणि बहीण-भावंडांचे अनोखे मिलन संस्थेने घडवून आणले. त्या गावात विदेशातून आलेल्या मुलीचे बॅण्ड लावून स्वागत झाले. भारतीय समाजसेवा केंद्राच्या शाखा संचालिका छाया पवार बोलत होत्या.

भारतीय समाजसेवा केंद्राच्या छत्रपती संभाजीनगर शाखेला आज ३० वर्षे पूर्ण झाली. आजपर्यंत ५३८ बाळांना दत्तक प्रक्रियेमार्फत हक्काचे घर मिळाले आहे. तर १३०९ मुलांचा सांभाळ संस्थेने केला आहे. सध्या इथे १५ बालके आहेत. दत्तक गेलेली मुले आपल्या पहिल्या घराला भेट देण्यासाठी येतात. त्यांचा आग्रह असतो की आमचे जन्मदाते कोण आहेत ते सांगा, एकदा तरी त्यांना भेटू द्या. खऱ्या आई-वडिलांना भेटण्याची इच्छा असेल तर संस्था ताटातूट झालेल्यांची एकदा भेट घालून देते.

परदेशातून आले पत्रविदेशात दत्तक गेलेल्या मुलाने पालकांसाठी एक पत्र पाठवले. शोध घेतल्यावर लक्षात आले की, १९९४ मध्ये आई-वडिलांनी त्याला जन्मानंतर एक आजार असल्यामुळे संस्थेत सोडले. सर्व्हेच्या बहाण्याने कर्मचारी त्यांच्या घरी पोहोचले. त्यांची पत्नी या जगात नव्हती. सुना-नातवंडांनी भरलेले ते घर होते. वडील म्हणाले, आम्ही आमच्या मुलाला कधीच विसरू शकलो नाही. मुलाचे पत्र वाचून वडील धाय मोकलून रडले. मुलगा आनंदात, सुखात आहे हे पाहून ते सुखावले. मात्र, पुढे त्यांनी मुलाला भेटायला नकार दिला. त्यांच्या कुटुंबीयांचे फोटो परदेशात असलेल्या मुलाला पाठवले गेले.

आईचे नाव सांगा१० वर्षांची मुलगी तिच्या पालकांसोबत संस्थेत आली. तिला तिच्या जन्मदात्या आईला भेटायचे होते. मात्र, ती सज्ञान नसल्यामुळे संस्था काहीही करु शकणार नव्हती. तिने खूप रडत रडतच हट्ट केला की, मला माझ्या आईचे पहिले नाव तरी सांगा. तिला संस्थेने १८ वर्षांची झाल्यानंतर तू ये असे सांगितले. ती मुलगी काही वर्षांनी नक्की येईल असे छाया पवार म्हणाल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Adopted children seek biological parents, even from abroad.

Web Summary : An organization reunites adopted children with biological relatives when possible. Some adoptees, even from abroad, seek their birth parents. One man, given up due to illness, received a letter that moved his biological father to tears. A young girl yearns for her mother's name.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरsocial workerसमाजसेवक