व्हाईट टॉपिंंगचे १५० कोटींचे ४४ रस्ते होणार डिफर्ड पेमेंटवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 00:55 IST2016-10-29T00:26:03+5:302016-10-29T00:55:35+5:30
औरंगाबाद : शहरातील रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावेत यासाठी ३८ रस्त्यांचे व्हाईट टॉपिंगने काम करण्यात येणार आहे. १५० कोटींतून ४४ रस्ते तयार करण्यात येणार असून

व्हाईट टॉपिंंगचे १५० कोटींचे ४४ रस्ते होणार डिफर्ड पेमेंटवर
औरंगाबाद : शहरातील रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावेत यासाठी ३८ रस्त्यांचे व्हाईट टॉपिंगने काम करण्यात येणार आहे. १५० कोटींतून ४४ रस्ते तयार करण्यात येणार असून, चार वर्षांपासून बंद केलेला डिफर्ड पेमेंटचा आतबट्ट्यांचा खेळ पालिका पुन्हा नव्याने करण्याच्या विचारात आहे.
१५० कोटींच्या योजनेत पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर यात भर दिला जाणार आहे. निधीसंदर्भात राज्य शासनाकडे प्रशासनातर्फे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर होईपर्यंत डिफर्ड पेमेंट तत्त्वावर ही कामे सुरू केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहराच्या मध्यवर्ती भागातून खडकेश्वर मंदिर, बीबीका मकबरा, छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय, सोनेरी महल, विद्यापीठ परिसराकडे जाता यावे यासाठी निराला बाजार ते खडकेश्वरपर्यंतच्या रस्त्याचे, औरंगपुऱ्यातील महात्मा फुले चौकापासून नेहरू भवन, सिटी क्लब तसेच औरंगपुरा भाजीमंडई ते सुराणा कॉम्प्लेक्समार्गे सिटीचौक आणि मकाईगेट ते बीबीका मकबरापर्यंतचा रस्ता व्हाईट टॉपिंग करण्यात येणार आहे. सातारा खंडोबा मंदिराकडे जाण्यासाठी एमआयटी कॉलेज ते खंडोबा मंदिराजवळील रस्ता पुलापर्यंत करण्यात येणार आहे.
जटवाडा येथील जैन मंदिर, हर्सूल तलाव, स्मृतिवन व जळगावकडे जाणारा हडको एन-१२, अण्णाभाऊ साठे चौक ते हडको कॉर्नर ताज हॉटेलपर्यंतच्या ३० मीटर रस्त्याचे व्हाईट टॉपिंग करण्याचा प्रस्ताव
आहे.