कुजबुज औरंगाबाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:02 IST2021-06-29T04:02:11+5:302021-06-29T04:02:11+5:30

शहर पोलिसांना ७४ मोटारसायकलचे लोकार्पण करण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई आणि आ. प्रदीप जैस्वाल हे दुचाकीजवळ ...

Whispers Aurangabad | कुजबुज औरंगाबाद

कुजबुज औरंगाबाद

शहर पोलिसांना ७४ मोटारसायकलचे लोकार्पण करण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई आणि आ. प्रदीप जैस्वाल हे दुचाकीजवळ आले. काटक शरीरयष्टीमुळे पालकमंत्री सहजपणे एक टांग टाकून दुचाकीवर स्वार झाले आणि त्यांनी एक चांगली ‘पोझ’ दिली. त्यांचे पाहून आ. प्रदीप जैस्वाल यांनाही दुचाकीवर बसण्याचा मोह झाला. मग काय, आमदारसाहेबांनी मोटारसायकलवर बसण्यासाठी एक टांग वर केली. मात्र, त्यांना सहज मोटारसायकलवर बसणे जमेना. पहिला प्रयत्न फसल्यावर त्यांनी दुसरा प्रयत्न केला. त्यात असफल झाले. मग तिसरा प्रयत्न केला; पण हार मानतील ते जैस्वाल कसले? शेवटी त्यांच्या चौथ्या प्रयत्नाला यश आले आणि ते मोटारसायकलवर विराजमान झाले. तेव्हा काहीजण म्हणाले, ‘आमदार साहेब, मोटारसायकलवर बसण्याचा एवढा हट्ट कशाला?’ मात्र, त्यांच्या मोटारसायकलवर बसण्याच्या प्रयत्नांना उपस्थितांनी दाद दिली.

(कुजबुज )

Web Title: Whispers Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.