कुजबुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:04 IST2021-07-19T04:04:46+5:302021-07-19T04:04:46+5:30
महापालिका निवडणुका कधी होतील कोणालाच माहीत नाही. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरण, ओबीसी आरक्षण, कोरोना आदी कारणांमुळे निवडणूक लांबते आहे. ...

कुजबुज
महापालिका निवडणुका कधी होतील कोणालाच माहीत नाही. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरण, ओबीसी आरक्षण, कोरोना आदी कारणांमुळे निवडणूक लांबते आहे. मात्र, इच्छुक मोठ्या उमेदीने वॉर्डात आपपला झेंडा रोवून आहेत. सर्व राजकीय पक्षांनी अलीकडेच उमेदवार निवडीसाठी चाचपणी केली. भाजपमध्ये एकाच वॉर्डात एकसारख्या नावाच्या तीन महिलांनी दावा केला. तिन्ही इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारीची आपली ‘मनिषा’ व्यक्त केली. उमेदवारी द्यावी तर कोणाला हा पक्षासाठी जटील प्रश्न आहे. एक माजी नगरसेविका, एक पक्षाच्या माेठ्या पदावर तर तिसऱ्याही पदाधिकारी आहेत. पक्षाची ‘मनिषा’काय हे तर काळाच्या पोटातील गूढ आहे. वॉर्डात इच्छुकांनी काही दिवसांपासून फिल्डिंगही लावायला सुरुवात केली. त्यातील दोन जणांची नावे आणि आडनावेही सारखीच आहेत. त्यामुळे मतदारांची कोंडी होणार आहे. मतदार कोणाची ‘मनिषा’ पूर्ण करतील, अशी कुजबुज वॉर्डात सुरू आहे.