शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

कर कमी करण्यासाठी घेतला व्हिस्कीचा खंबा, एसीबीने रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 11:16 IST

औरंगाबादेतील प्रकार; एसीबीने पकडले रंगेहाथ

लोकमत न्यूज नेटवर्क     औरंगाबाद : मालमत्ता कर कमी करण्यासाठी घरमालकाकडून लाचेच्या स्वरूपात साडेतीन हजार रुपये आणि व्हिस्कीचा खंबा   घेताना महापालिकेच्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी सिडको परिसरात करण्यात आली. प्रभू लक्ष्मण चव्हाण (५२) असे अटकेतील कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे.   

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सिडको एन ६ मधील रहिवासी विठ्ठल गजानन दाभाडे यांचे संभाजी कॉलनीत घर आहे. त्यांना महापालिकेच्या वॉर्ड  ब कडून मालमत्ता कराची नोटीस प्राप्त झाली होती. हा कर कमी करावा, याकरिता त्यांनी कनिष्ठ लिपिक प्रभू चव्हाण याची भेट घेतली. तेव्हा त्याने कर कमी करून देण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी दाभाडे यांच्याकडे केली. दाभाडे यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी चव्हाणची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष ३० मार्च रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली तेव्हा आरोपीने तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. यापैकी नगदी दीड हजार रुपये घेतले. उर्वरित साडेतीन हजार रुपये आणि दारूचा एक खंबा ३१ मार्च रोजी आणून देण्याचे सांगितले. यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी सिडको वॉर्ड कार्यालय परिसरात सापळा रचला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग