लाच घेताना रोखपाल चतुर्भुज
By Admin | Updated: April 30, 2015 00:38 IST2015-04-30T00:15:11+5:302015-04-30T00:38:47+5:30
बीड : भविष्य निर्वाह निधीची दाखल केलेली फाईल औरंगाबाद येथील कार्यालयास मंजुरीसाठी पाठविण्याकरिता साडेतीन हजार रूपयांची लाच स्वीकारताना

लाच घेताना रोखपाल चतुर्भुज
बीड : भविष्य निर्वाह निधीची दाखल केलेली फाईल औरंगाबाद येथील कार्यालयास मंजुरीसाठी पाठविण्याकरिता साडेतीन हजार रूपयांची लाच स्वीकारताना बीड जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहुद्देशिय बँक म. (भूविकास बँक) च्या रोखपालास एसीबीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी रंगेहात पकडण्यात आले.
संजय वैजीनाथ कानडे असे त्या रोखपालाचे नाव आहे. बीड जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहुद्देशिय विकास बँकेतील कर्मचारी सत्यनारायण प्रल्हादराव फुंदे यांनी भविष्य निर्वाह निधीसाठी फाईल दाखल केली होती. ही फाईल मंजुरीसाठी पाठविण्यासाठी रोखपाल कानडे यांनी फुंदे यांच्याकडे साडेतीन हजार रूपयांची मागणी केली. ही रक्कम स्वीकारताना कानडे यांना बीड शहरातील अण्णा भाऊ साठे चौक परिसरातील एका हॉटेलच्या आवारात रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (प्रतिनिधी)