लाच घेताना मुख्याध्यापक चतुर्भुज
By Admin | Updated: January 6, 2017 00:13 IST2017-01-06T00:10:03+5:302017-01-06T00:13:36+5:30
कडा : मुलाच्या वैद्यकीय बिलाच्या संचिकेवर स्वाक्षरी करण्यासाठी हजाराची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकास गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

लाच घेताना मुख्याध्यापक चतुर्भुज
कडा : मुलाच्या वैद्यकीय बिलाच्या संचिकेवर स्वाक्षरी करण्यासाठी हजाराची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकास गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात झाली.
अशोक सयाजीराव गोल्हार असे त्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. ते मोतीलाल कोठारी विद्यालयात कार्यरत आहेत. याच विद्यालयातील शिक्षक बी. जे. दळवे यांनी आपल्या मुलाचे वैद्यकीय बिल मिळविण्यासाठी संचिका तयार केली होती. ती शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करण्यासाठी मुख्याध्यापक गोल्हार यांची शिफारस आवश्यक आहे. त्यासाठी गोल्हार यांनी १ हजार रुपये लाच मागितली. शिक्षक दळवे यांनी केलेल्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. दुपारी विद्यालयातील दलानातच गोल्हार यांना पैसे स्वीकारताच अधिकाऱ्यांनी झडप मारुन पकडले. त्यांच्याविरुद्ध आष्टी ठाण्यात गुन्हा नोंद केल्याचे उपअधीक्षक गणेश जवादवाड यांनी सांगितले. (वार्ताहर)