शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवर तणावात आली चक्कर त्यात चेनमध्ये अडकला पदर; मुलासमोरच आईचा करूण अंत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 14:39 IST

मुलासोबतत्याच्या स्पोर्टबाइकवरून जाताना चेनमध्ये साडीचा पदर अडकल्याने अपघात; छत्रपती संभाजीनगर-जळगाव रस्त्यावर चिंचखेडानजीक घटना

 

सिल्लोड ( छत्रपती संभाजीनगर) : भरधाव दुचाकीच्या चेनमध्ये पदर व स्कार्प अडकून डोक्यावर आपटल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजीनगर-जळगाव मार्गावर सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा गावाजवळ गुरुवारी सायंकाळी ५ वाजेदरम्यान घडली. मनीषा कैलास चौधरी (वय ४८ वर्ष रा. पहूर, ता.जामनेर) असे मयत महिलेचे नाव आहे.

जळगाव जिल्ह्यातील पहूर येथील रहिवासी मनीषा चौधरी या आपला मुलगा ऋषीकेशसोबत दुचाकी (एमएच १९ ईसी ३८७९) ने छत्रपती संभाजीनगर येथे एका फायनान्स कंपनीत कर्जाचे सेटलमेंट करण्यासाठी गुरुवारी सकाळी गेल्या होत्या. तेथून गावाकडे परतताना सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा गावानजीक दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या मनीषा यांच्या साडीचा पदर तसेच स्कार्प हा दुचाकीच्या चेनमध्ये अडकला. यामुळे त्या वेगाने रस्त्यावर फेकल्या गेल्या. झटका बसल्याने दुचाकीही खाली पडली. डोक्यावर पडल्याने मनीषा या गंभीर जखमी होऊन निपचित पडल्या. तर ऋषिकेशला कोणतीही इजा झाली नाही. मात्र तो घटनेनंतर प्रचंड घाबरला होता. नागरिकांनी धाव घेत दोघा मायलेकांना तत्काळ सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मनीषा यांना तपासून मयत घोषित केले. मनीषा चौधरी यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. चौधरी कुटुंबीयांचे पहूर येथे ऑटोमोबाईलचे दुकान आहे.

तणावामुळे आली होती चक्करअपघातात ठार झालेल्या मनीषा चौधरी यांच्या पतीने २०१८ मध्ये एका खाजगी फायनान्स कंपनीकडून १५ लाख रुपये होम लोन घेतले होते. कर्जाची रक्कम १५ लाख त्यांनी भरली होती; मात्र अजून फायनान्स कंपनीने त्यांच्याकडे २१ लाख थकबाकी काढली होती. पैसे भरले नाही म्हणून त्यांनी मनीषा यांच्या घराचा लिलाव करण्याची नोटीस दिली होती. कर्जाची मुदत वाढवून द्या, अशी सेटलमेंट करण्यासाठी मनीषा या आपल्या मुलासोबत छत्रपती संभाजीनगर येथील फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये गेल्या होत्या. मात्र फायनान्स कंपनीने त्यांचे ऐकले नाही म्हणून ते परत घराकडे निघाले होते. या तणावातच दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या मनीषा यांना चक्कर आली. तेव्हा त्या डोक्याला बांधलेला स्कार्प काढताना साडीचा पदर व स्कार्प दोन्ही चेनमध्ये अडकून हा अपघात झाला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघातDeathमृत्यू