२० हजारांची लाच घेताना अभियंता चतुर्भूज
By Admin | Updated: December 19, 2014 00:55 IST2014-12-19T00:41:29+5:302014-12-19T00:55:32+5:30
जालना : तळेगाव ता. घनसावंगी येथील एका मंजुर कामाचे आदेश देणे व मार्कआऊट टाकण्यासाठी २० हजाराची लाच घेताना पंचायत समितीचे बांधकाम विभागातील

२० हजारांची लाच घेताना अभियंता चतुर्भूज
जालना : तळेगाव ता. घनसावंगी येथील एका मंजुर कामाचे आदेश देणे व मार्कआऊट टाकण्यासाठी २० हजाराची लाच घेताना पंचायत समितीचे बांधकाम विभागातील शाखा अभियंता रामकिसन नाथा फुंदे (वय ४८, रा. भाग्यनगर, जालना) यांना गुरूवारी दुपारी ४.४० वाजता लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
घनसावंगी पंचायत समिती हद्दीतील तळेगाव येथे विकास कामासाठी निधी प्राप्त झाला होता. शेष निधीमधून ३ लाख रुपये मंजुरही झाले होते. यासाठी पं.स. उपसभापती यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. कामाची वर्कआर्डर व मार्कआऊट साठी ते शाखा अभियंता फुंदे यांना भेटले. तेव्हा या कामासाठी ५० हजार रुपये लागतील, असे फुंदे यांनी सांगितले. दरम्यान, उपसभापती यांनी याबाबत अॅन्टीकरप्शन ब्युरो कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार गुरूवारी नूतन वसाहत येथील राऊत क्लिनिक नावाच्या खाजगी दवाखान्यात पोलीस पथकाने सापळा रचला. तेथे पंचासमक्ष २० हजार रुपयांची लाच घेताना फुंदे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सदरचा सापळा पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी व अप्पर पोलिस अधीक्षक नेकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक प्रताप शिकारे, पोलिस निरीक्षक व्ही.बी. चिंचोले, पो.नि. एस.एम. मेहत्रे, कर्मचारी किशोर पाटील, नंदू शेंडीवाले, अमोल आगलावे, संजय उदगीरकर, प्रदीप उबाळे, रामचंद्र कुदर, गंभीर पाटील, रमेश चव्हाण, संदीप लव्हारे, चालक राजपूत यांनी पार पाडली. (वार्ताहर)