शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

उत्पादक कंपनी कोणती, कुठली? औषधी मिळेपर्यंत नसतो सरकारी रुग्णालयांना थांगपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 20:07 IST

स्थानिक पातळीवरील औषधी खरेदीतील प्रकार; बनावट औषधी पुरवठा होण्यालाच हातभार, सुधारणा गरजेची

छत्रपती संभाजीनगर : औषधी पुरवठा होईपर्यंत कोणत्या उत्पादक कंपन्यांची औषधी मिळणार, ही कंपनी कुठे आहे, याचा सरकारी रुग्णालयांना थांगपत्ता लागत नाही. ही परिस्थिती स्थानिक पातळीवरील औषधी खरेदी प्रक्रियेतील आहे. औषधी पुरवठाधारक एजन्सी जी औषधी देईल, ती ‘गुपचूप’ घेतली जात असल्याची धक्कादायक स्थिती आहे. त्यातून बनावट औषधी पुरवठा होण्याला हातभार लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्य पातळीवरून सरकारी रुग्णालयांना औषधांचा पुरवठा होतो. राज्य पातळीवरील औषध खरेदी प्रक्रियेत औषधांचे उत्पादक समोर येतात. मात्र, स्थानिक पातळीवरील औषधखरेदी प्रक्रियेत रुग्णालयांना औषधी पुरवठा करण्याच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होतात. या प्रक्रियेत औषधी पुरवठाधारक आवश्यक ती प्रक्रिया करून निविदा रक्कम, सुरक्षा ठेव भरतात. नियमानुसार निविदा मान्य झाल्यानंतर पुरवठादार औषधी रुग्णालयांना पुरवितात. तोपर्यंत औषधी ही ‘डब्ल्यूएचओ- गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस’, ‘गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस’ प्रमाणित उत्पादकाची असावी, असे कागदोपत्री बंधनकारक असते. कागदोपत्रीच खेळ असल्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट औषधपुरवठा होण्यास हातभार लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रक्रियेत सुधारणा गरजेची असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

बनावट, निकृष्ट औषधी पुरवणाऱ्या टोळ्यापुरवठादार स्वतःच्या फायद्यासाठी जनतेच्या आरोग्याशी खेळतात, हे अन्न व औषध प्रशासनाने विविध ठिकाणी छापे मारून परीक्षण केले असता आढळून आले आहे. बनावट व निकृष्ट दर्जाची औषधे पुरवणाऱ्या टोळ्याच बनल्या आहेत. त्याचप्रमाणे यांच्यासोबतच काही औषधी कंपन्याही फायदा लाटण्यासाठी सामील झाल्याचे आढळून आले आहे. तरी अशा आरोपींविरुद्ध ‘औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, आदींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१’ या कायद्याचे ‘अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती’या शीर्षाखाली एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई संबंधित जिल्हा दंडाधिकारी अथवा पोलिस आयुक्त करू शकतात. परिणामकारक कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेचे आरोग्य अबाधित राहून जनतेची व शासनाची होणारी फसवणूक थांबवली जाऊ शकते व अशा बाबींचे समूळ उच्चाटन केले जाऊ शकते.- ॲड. द्वारकादास भांगे, ॲडव्होकेट, उच्च न्यायालय तथा माजी पोलिस उपनिरीक्षक.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्यMedicalवैद्यकीय