शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरमधील कचरा जातोय तरी कुठे? महिनाभरात १ हजार मेट्रिक टन कचरा घटला

By मुजीब देवणीकर | Updated: August 18, 2023 19:38 IST

जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात १ हजार २४३ मेट्रिक टन कचरा घटल्याची धक्कादायक बाब समोर आली.

छत्रपती संभाजीनगर : मनपा प्रशासनाने १ ऑगस्टपासून ओला-सुका कचरा स्वीकारण्याचे धोरण पत्करले. ज्या भागातून मिक्स कचरा येईल, त्या भागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे कचरा वर्गीकरणाचे प्रमाण ९१ टक्क्यांपर्यंत गेले. मात्र, जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात १ हजार २४३ मेट्रिक टन कचरा घटल्याची धक्कादायक बाब समोर आली. नेमका हा कचरा जातोय कुठे याचा शोध महापालिकेकडून सुरू झाला आहे.

प्रशासक जी. श्रीकांत यांनी छत्रपती संभाजीनगर शहराला इन्दूरपेक्षाही सुंदर करण्याचा मानस व्यक्त केला. त्यासाठी ठोस पाऊल उचलण्यास सुरूवात झाली. ओला-सुका कचरा वेगळाच करून घेतल्या जातोय. त्यामुळे घंटागाडीतून येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण देखील घटल्याचे समोर आले आहे. महिनाभरात १ हजार २४३ मेट्रिक टन कचरा कमी आल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सोमनाथ जाधव यांनी सांगितले. ज्या भागात वर्गीकरण न करता कचरा दिला जातो, त्या भागात नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. कचऱ्यापासून खत कसे तयार होते. सुका कचरा कुठे पाठवला जातो, हे सांगितले जात आहे. कचरा वर्गीकरण आता ९१ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले. कचऱ्याचे प्रमाणही कमी झाल्याचे जाधव यांनी सांगितले. जून महिन्यात १५ हजार १० मे. टन कचरा आला. जुलै महिन्यात १३ हजार ७७५ मेट्रिक टन कचरा आल्याचे त्यांनी नमूद केले.

दुष्परिणाम आता समोर येत आहेतकचऱ्याचे प्रमाण कमी झाले असले तरी अनेक भागात भीतीपोटी किंवा वर्गीकरण केलेला कचरा रस्त्यावर फेकला जाण्याची भीती आहे. त्यामुळे रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाया केल्या जाणार असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले. कचऱ्यात पूर्वी दगड, माती असू शकते. वजन वाढविण्यासाठी काहीही केले जाऊ शकते. त्यामुळे मूळ कारणांचा शोध घेतोय, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका