शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

चारा कुठे, छावणीला की दावणीला? निर्णयच होईना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 4:32 AM

मराठवाड्यात दुष्काळामुळे चाऱ्याची अडचण निर्माण झाली असून, विभागातील ६७ लाख ६१२ जनावरांना (पशुधनाला) दुष्काळाच्या झळा बसत आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे चाऱ्याची अडचण निर्माण झाली असून, विभागातील ६७ लाख ६१२ जनावरांना (पशुधनाला) दुष्काळाच्या झळा बसत आहेत. पशुसंवर्धन विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालानुसार जानेवारीपर्यंत चारा पुरेल, अशी स्थिती असताना, चारा छावणीला द्यायचा की दावणीला, याबाबतचे धोरण सरकारी दरबारी ठरलेले नाही.परिणामी, पुढील सहा महिने म्हणजेच जून, २०१९ पर्यंत शेतकºयांना जनावरे जगविणे अवघड ठरणार आहे. विभागात ३६ लाख २५ हजार ४९० मोठी जनावरे आहेत. ११ लाख ३६ हजार ३९४ लहान जनावरे आहेत. शेळ्या व मेंढ्यांची संख्या १९ लाख ४५ हजार ७२८ आहे. मराठवाड्यात दिवसाला २६ हजार ३३० टन इतका चारा लागतो. जनावरांसाठी दररोज १२ ते २० किलो इतक्या चाºयाची आवश्यकता असते. सध्या अंदाजे ५ कोटी ७४ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. दुष्काळामुळे उपलब्ध चाराही घटणे शक्य आहे. जानेवारीपर्यंत पुरेल इतकाच हा चारा असल्याचे पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे. या वर्षीच्या पावसाळ्यात मराठवाड्यात कमी पाऊस झाला. ६३ टक्के पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले, शिवाय चाराही उपलब्ध होणार नाही. त्यामुळे शेतकºयांसमोर जनावरांना जगविण्याचा मोठा प्रश्न आहे. जून २०१९ पर्यंत चारा कमी पडणार नाही. एका गावात पिण्यासाठी दोन टँकरने पाणीपुरवठा होत असेल, तर पशुधनासाठी देखील दोन टँकर पिण्याचे देण्याबाबत तातडीने तरतूद करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाºयांना पशुसंवर्धनमंत्र्यांनी डिसेंबर २०१८ मध्ये दिले होते, परंतु त्यानुसार काहीही निर्णय झालेला नाही.महसूल उपायुक्तांचीमाहिती अशीप्रभारी महसूल उपायुक्त डॉ. विजयकुमार फड म्हणाले, चारा छावण्यांबाबत शासनाकडून अजून कुठलाही धोरणात्मक निर्णय झालेला नाही, तसेच शासनाकडून अजून काहीही सूचना विभागीय प्रशासनाला आलेल्या नाहीत.>काय म्हणाले होते पशुसंवर्धनमंत्री...मराठवाड्यातील पशुधनाला चारा कमी पडल्यास पालघर येथील पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीवरील चारा रेल्वेने पुरविला जाईल. छावणीतूनच पशुधनासाठी चारा आणि पाणी द्यावे लागेल, असे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी १३ डिसेंबर रोजी स्पष्ट केले होते. दीड महिना होत आला असून, चारा छावणीबाबत काहीही निर्णय झालेला नाही.>जिल्हानिहाय पशुधनजिल्हा पशुधनऔरंगाबाद १० लाख ६७ हजार ४१२जालना ६ लाख ९९ हजार २४परभणी ६ लाख २२ हजार २००बीड १२ लाख २४ हजार ७९८लातूर ७ लाख ५२ हजार ४२६उस्मानाबाद ७ लाख ३७ हजार ३४७नांदेड ११ लाख ४४ हजार ७२५हिंगोली ४ लाख ५९ हजार ६८०एकूण ६७ लाख ६१२